महान क्रांतीकारी ज्याच्या अस्थी खुद्द नरेंद्र मोदी खांद्यावर घेऊन आले होते, 56 वर्षांनंतर पूर्ण झाली इच्छा!

Last Updated:

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. देशातील नागरिक तर या लढ्यात सहभागी झालेच, पण देशाबाहेर राहूनही स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारे अनेक स्वातंत्र्यसैनिक होते.

News18
News18
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक क्रांतिकारकांनी योगदान दिलं. त्यापैकी काही नावं आजही फारशी परिचित नाहीत. मात्र त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. श्यामजी कृष्ण वर्मा हे त्यापैकीच एक. ब्रिटनमध्ये राहून त्यांनी स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली. 30 मार्च 1930 रोजी त्यांचं निधन झालं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांचं अस्थिविसर्जन भारतात व्हावं ही त्यांची इच्छा होती, मात्र स्वातंत्र्य मिळूनही ती लगेच पूर्ण झाली नाही. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2003 साली त्यांच्या अस्थी जीनिव्हा इथून भारतात आणल्या.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. देशातील नागरिक तर या लढ्यात सहभागी झालेच, पण देशाबाहेर राहूनही स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारे अनेक स्वातंत्र्यसैनिक होते. श्यामजी कृष्ण वर्मा हे त्यांपैकीच एक. त्यांनी खुद्द इंग्रजांच्याच देशात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं बीज पेरलं होतं. त्या काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी बहुमोल कार्य केलं. 30 मार्च 1930 रोजी त्यांचं निधन झालं, तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांच्या अस्थी भारतात आणल्या जाव्यात ही त्यांची शेवटची इच्छा होती, मात्र ती पूर्ण व्हायला 2003 साल उजाडावं लागलं. जाणून घ्या त्यांचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल.
advertisement
श्यामजींचा जन्म 4 ऑक्टोबर 1857 मध्ये गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मांडवीमध्ये झाला. ते हुशार होते. संस्कृत तसंच इतरही भाषा ते शिकले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर देशातील काही संस्थानांमध्ये त्यांनी दिवाण म्हणून काम केलं. संस्कृतच्या विशेष ज्ञानामुळे ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृत शिकवणाऱ्या प्राध्यापक मोनियर विल्यम्स यांना वर्मा यांच्याविषयी माहिती कळाली. त्यानंतर वर्मा ऑक्सफर्डमध्ये इंग्रजी शिकवण्यासाठी गेले आणि तिथेच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची ज्योत पेटवली.
advertisement
श्यामजी यांच्यावर भारतातील क्रांतिकारकांचा प्रभाव होता. लोकमान्य टिळक, स्वामी दयानंद सरस्वती, हर्बर्ट स्पेन्सर यांच्या प्रभावामुळे श्यामजी यांनी लंडनमध्ये ‘इंडियन होमरूल सोसायटी’, ‘इंडिया हाउस’ आणि ‘द इंडियन सोशिऑलॉजिस्ट सोसायटी’ अशा संस्थांची स्थापना केली. ब्रिटिशांविरोधी क्रांतिकारी कारवाया करण्यासाठी ब्रिटनमध्ये असलेल्या भारतीय तरुणांना प्रेरणा देण्याचं काम इंडियन होमरूल सोसायटी आणि इंडिया हाउसनं केलं. इंडियन होमरूल सोसायटीच्या माध्यमातून श्यामजी आणि इतर क्रांतिकारकांनी भारतातील ब्रिटिश राजवटीवर टीका करण्यास सुरुवात केली.
advertisement
advertisement
श्यामजी हे बॉम्बे आर्य समाजाचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनमधील इंडिया हाउसचे सदस्य बनले. श्यामजींनी कायद्याचं देखील शिक्षण घेतलं होतं. ते लंडनमध्ये बॅरिस्टर म्हणून कार्यरत होते. 1905 साली ब्रिटिश सरकारविरुद्ध लिखाण केल्यानं त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना वकिलीची परवानगी नाकारण्यात आली होती. लंडनधील बॅरिस्टर आणि न्यायाधीशांच्या चार मान्यवर समूहांपैकी एक असलेल्या ‘ऑनरेबल सोसायटी ऑफ द इनर टेम्पल’च्या गव्हर्निंग काउन्सिलने श्यामजी यांना मरणोत्तर ही परवानगी दिली. श्यामजी यांच्या प्रकरणात निष्पक्षपणे सुनावणी झाली नाही, असं सांगत इनर टेम्पलनं 2015 मध्ये श्यामजी यांची वकिली करण्याची परवानगी मरणोत्तर बहाल केली.
advertisement
श्यामजी यांनी त्यांचं आंदोलन त्यानंतर इंग्लंडऐवजी फ्रान्समधील पॅरिसमधून सुरू ठेवलं. पहिल्या महायुद्धावेळी ते स्वित्झर्लंडमधील जीनिव्हामध्ये गेले. उर्वरित आयुष्य त्यांनी तिथेच व्यतीत केलं. 30 मार्च 1930 मध्ये त्यांचं निधन झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांच्या अस्थी भारतात आणण्यात याव्यात, अशी त्यांची शेवटची इच्छा होती, मात्र भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळूनही त्यांच्या अस्थी आणण्यासाठी जीनिव्हा इथे कोणीही गेलं नाही. अखेर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीनिव्हाला जाऊन 22 ऑगस्ट 2003 रोजी श्यामजी यांच्या अस्थी भारतात आणल्या.
advertisement
भारतात आल्यावर गुजरातमध्ये भव्य वीरांजली यात्रा आयोजित करण्यात आली होती. श्यामजी यांचा अस्थिकलश गुजरातच्या 17 जिल्ह्यांमधून नेण्यात आला. तिथे नागरिकांनी श्यामजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याकरिता खास गाडी तयार करण्यात आली होती, त्याला वीरांजली वाहिका असं नाव देण्यात आलं होतं. मांडवीमध्ये (कच्छ) त्यांच्या कुटुंबियांकडे तो अस्थिकलश देण्यात आला. तत्कालीन गुजरात सरकारनं श्यामजी वर्मा यांच्या सन्मानार्थ मांडवीजवळ एक मेमोरियल तयार केलं. क्रांती तीर्थ असं त्याचं नाव आहे. 13 डिसेंबर 2010 ला त्याचं लोकार्पण करण्यात आलं. ते 52 एकर जागेवर तयार केलं आहे. त्या मेमोरियल कॉम्प्लेक्समध्ये इंडिया हाउसच्या बिल्डिंगची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. श्यामजी कृष्ण वर्मा आणि त्यांच्या पत्नीचे फोटो तिथे लावले आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर 2015 साली इनर टेम्पल सोसायटीनं श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी मायदेशी आणण्यासाठी लंडनमध्ये मोदी यांना एक प्रमाणपत्रही दिलं होतं. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी त्यावेळी एक प्रेझेंटेशनही दिलं होतं. महान स्वातंत्र्यसेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी भारतात आणून नरेंद्र मोदी यांनी त्यांची अखेरची इच्छा पूर्ण केली.
मराठी बातम्या/Politics/
महान क्रांतीकारी ज्याच्या अस्थी खुद्द नरेंद्र मोदी खांद्यावर घेऊन आले होते, 56 वर्षांनंतर पूर्ण झाली इच्छा!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement