हृदयद्रावक! उदरनिर्वाहासाठी गेलेल्या पुण्यातील महिलेला नियतीनं गाठलं; साफसफाई करतानाच गेला जीव
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
गुरुवारी दुपारी त्या नेहमीप्रमाणे साफसफाईचं काम करत होत्या. इमारतीच्या परिसरातील भूमिगत पाण्याच्या टाकीमध्ये अचानक त्यांचा तोल जाऊन त्या पडल्या.
पिंपरी: पिंपरी-चिंचवडजवळील डुडुळगाव येथील वहिलेनगर परिसरात गुरुवारी (११ डिसेंबर) एक दुर्दैवी घटना घडली. दुपारी दोनच्या सुमारास एका भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आशाबाई ढोणे (वय ४५, रा. वहिलेनगर, डुडुळगाव) असं या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आशाबाई ढोणे या यशदा स्प्लेंडर पार्क नावाच्या इमारतीमध्ये साफसफाईचं काम करण्यासाठी नियमित येत होत्या. गुरुवारी दुपारी त्या नेहमीप्रमाणे साफसफाईचं काम करत होत्या. इमारतीच्या परिसरातील भूमिगत पाण्याच्या टाकीमध्ये अचानक त्यांचा तोल जाऊन त्या पडल्या. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
advertisement
काही वेळाने इमारतीच्या परिसराची पाहणी करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि दिघी पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आशाबाई ढोणे यांना त्या पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले.
त्यांना तात्काळ पिंपरी येथील वायसीएम (YCM) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ज्यामुळे ही घटना अत्यंत हृदयद्रावक ठरली.
advertisement
या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, दिघी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. साफसफाईचे काम करत असताना हा अपघात कसा झाला, याबाबत पोलीस बारकाईने चौकशी करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 12, 2025 11:13 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
हृदयद्रावक! उदरनिर्वाहासाठी गेलेल्या पुण्यातील महिलेला नियतीनं गाठलं; साफसफाई करतानाच गेला जीव









