डिजिटल युगातही जगाला भुरळ, पण ढोल नेमका बनतो कसा? कातडी की फायबर चांगला कोणता?

Last Updated:

Drum Making: गणेशोत्सवाला ढोल-ताशा सर्वांनाच थिरकायला भाग पाडतो. पण हा जगाला भुरळ घालणारा ढोल कसा? बनतो हे पाहू.

+
डिजिटल

डिजिटल युगातही जगाला भुरळ, पण ढोल नेमका बनतो कसा? कातडी की फायबर चांगला कोणता?

पुणे : महाराष्ट्रातील गणेशोत्सव, नवरात्र, गुढीपाडवा यांसारख्या सणांमध्ये उत्साह वाढवणारा आणि पारंपरिक संस्कृतीशी घट्ट जोडलेलं वाद्य म्हणजे ढोल. ढोलाच्या प्रत्येक ठोक्याशी आपल्या सणांचा जिवंत नाद असतो. मात्र, या ढोलामागे असणारी कला, कौशल्य आणि  प्रयत्न अनेकांना माहिती नसतो. या पार्श्वभूमीवर नेमका ढोल कसा तयार होतो हे पुण्यातील ओमकार गाडे यांच्याकडून जाणून घेऊ.
गेल्या 70 वर्षांपासून गाडे कुटुंब ढोल बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत आहे. सध्या या व्यवसायात तिसरी पिढी कार्यरत असून, वर्षभरात सुमारे 20 ते 25 हजार ढोलपानं (ढोलाच्या दोन्ही बाजूंवरील भाग) तयार केली जातात. हे काम सातत्याने चालत असून, सात ते आठ कुशल कारागीर या प्रक्रियेत सहभागी असतात.
advertisement
ढोल तयार कसा होतो?
ढोलाचा मुख्य भाग म्हणजे पिंप, जो पत्र्यापासून तयार केला जातो. हा ड्रम तयार करण्यासाठी साधारणतः अर्धा तास लागतो. त्यानंतर दोन्ही बाजूंना पान बसवले जाते, जे बकऱ्याच्या चमड्यापासून बनवलेले असते. हे पान हाताने शिवले जाते आणि दोऱ्यांनी घट्ट आवळले जाते. यामुळे ढोलाला योग्य आवाज आणि ट्युनिंग मिळते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक ते दीड दिवस लागतो.
advertisement
ढोलाच्या एका बाजूला मीन लावले जाते. याच बाजूने टिपरू वापरून ढोल वाजवला जातो. दुसऱ्या बाजूला, जिथे हाताने वाजवले जाते, त्या भागाला चाप म्हणतात. या दोन्ही भागांची गुणवत्ता आणि बांधणी अत्यंत महत्त्वाची असते, कारण यावरच ढोलाचा आवाज आणि टिकाऊपणा अवलंबून असतो.
पानांचे प्रकार व किमती
ढोलासाठी दोन प्रकारचे पान वापरले जातात. चमड्याचे पारंपरिक पान आणि फायबरचे आधुनिक पान. फायबर पानांची किंमत 500 ते 600 रुपये, तर चमड्याच्या पानांची किंमत 600 ते 1000 रुपये पर्यंत असते. आजही आवाजाच्या गुणवत्ता आणि टिकावू स्वरूपामुळे चमड्याची पानं जास्त प्रमाणात वापरली जातात.
advertisement
साईझ व मागणी
ढोल विविध साईझमध्ये उपलब्ध असतो. 10 इंचांपासून 35 इंचांपर्यंत, यामध्ये 26, 28 व 30 इंच साईझ सर्वाधिक लोकप्रिय आहेत. पुण्यात तयार होणाऱ्या ढोलांची मागणी महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांमध्येच नव्हे, तर यूएसए, यूके, कॅनडा, दुबई यांसारख्या परदेशांमध्येही वाढत आहे. यामागे ढोल-ताशा पथकांची वाढती लोकप्रियता हे एक मुख्य कारण आहे.
आजही गाडे कुटुंबाचा हा व्यवसाय पूर्णतः हस्तकौशल्यावर आधारित आहे. आजच्या डिजिटल युगातही ढोलाचा पारंपरिक आवाज आणि त्यामागे असणारे हातांची जादू अजूनही लोकांना भुरळ घालते. अशा परंपरा जपणाऱ्या व्यवसायांना संवर्धनाची आणि प्रोत्साहनाची गरज आहे, जेणेकरून ही संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकेल.
मराठी बातम्या/पुणे/
डिजिटल युगातही जगाला भुरळ, पण ढोल नेमका बनतो कसा? कातडी की फायबर चांगला कोणता?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement