Career: डिग्री आहे पण नोकरी नाही?, ही संधी सोडू नका, पिंपरी-चिंचवडमध्ये इथं मिळतेय मोफत प्रशिक्षण, Video

Last Updated:

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

+
News18

News18

पुणे: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पदवी मिळवूनही नोकरी मिळत नाही ही समस्या सध्या अनेक विद्यार्थ्यांसमोर उभी टाकली आहे. कारण एकच कौशल्याचा अभाव. याच गोष्टीची जाणीव ठेवून मधुश्रम फाउंडेशन यांनी राह फाउंडेशन आणि एंजल वनच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहेत.
2023 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने आतापर्यंत 200 हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले असून, त्यापैकी सुमारे 70 टक्के विद्यार्थी सध्या विविध ठिकाणी नोकरी करत आहेत. या कोर्सेसमध्ये संवाद कौशल्यॲडव्हान्स एक्सेल, टॅली प्राईम, स्पोकन इंग्लिश, रिटेल आणि सेल्स यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना येथे केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर करिअर काउन्सेलिंग, पब्लिक स्पीकिंग, क्लासरूम ट्रेनिंग, प्रॅक्टिकल सेशन्स आणि मेडिकल कॅम्प अशा विविध उपयुक्त संधीही दिल्या जातात.
advertisement
शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून जबाबदारीची जाणीव, सहानुभूती आणि शाश्वत जीवनशैली घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी राबवले जाणारे कार्यक्रम मुलांना आणि प्रौढांना दर्जेदार शिक्षण देण्यावर केंद्रित आहेत. यामुळे समाजात समान संधी निर्माण होतात, सर्जनशीलतेला चालना मिळते आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे मधुश्रम फाउंडेशनचे संस्थापक अमोल मुंजे यांनी सांगितले. जर तुम्ही नोकरीचा शोधत असाल किंवा मग तुम्हाला तुमचे कौशल्य विकसित करायची असतील या संधीचा नक्कीच फायदा घ्या.
मराठी बातम्या/करिअर/
Career: डिग्री आहे पण नोकरी नाही?, ही संधी सोडू नका, पिंपरी-चिंचवडमध्ये इथं मिळतेय मोफत प्रशिक्षण, Video
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement