IAS Pooja Khedkar : आयएस पूजा मॅडमचा नवीन 'कार'नामा; जॉईन व्हायच्या आधीच... धक्कादायक WhatsApp चॅट समोर!

Last Updated:

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आता चांगल्याचं वादात सापडल्या आहेत. प्रोबेशन काळातच पूजा खेडकर यांनी स्वतंत्र ऑफिस, गाडीवर अंबर दिवा, दिमतीला शिपाई अशा नियमबाह्य मागण्या केल्या.

News18
News18
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आता चांगल्याचं वादात सापडल्या आहेत. प्रोबेशन काळातच पूजा खेडकर यांनी स्वतंत्र ऑफिस, गाडीवर अंबर दिवा, दिमतीला शिपाई अशा नियमबाह्य मागण्या केल्या, यानंतर पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली. पूजा खेडकर यांच्याबद्दलचा पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शासनाला पाठवलेला 25 पानी रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये व्हॉट्सऍप चॅटबद्दलचे धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
advertisement
पूजा खेडकरांच्या चॅटमध्ये काय?
'माझ्या येण्यापूर्वी कार आणि केबिनची व्यवस्था करा', असे पूजा खेडकर यांचे व्हॉट्सऍप चॅट समोर आले आहेत. पोस्टिंग आधीच पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला असे मेसेज पाठवले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात व्हॉट्सऍप चॅटचाही समावेश आहे. व्हॉट्सऍप चॅटच्या माध्यमातून पूजा खेडकर यांनी कार, केबिन आणि निवासस्थानाची मागणी केली होती. 3 जून 2024 रोजी पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जॉईन झाल्या होत्या.
advertisement
खेडकर यांच्या बंगल्यात झाकून ठेवण्यात आलेली ऑडी कार पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी वापरत होत्या. या कारवर त्यांनी महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती आणि नारिंगी रंगाचा दिवा लावला होता. पोलीसांच्या मते हा वाहतूक नियमांचा भंग असून पोलिसांनी 177 अंतर्गत कारवाई कारवाई करायचं ठरवलंय. त्यासाठी पुणे पोलिस खेडकर यांच्या बाणेर रस्त्यावरील बंगल्यासमोर आले असता पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. पुणे पोलिसांनी खेडकर यांना वॉट्स ऍपवर नोटीस पाठवलीय. या नोटीशीत MH -12 AR 7000 क्रमांकाच्या या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे, असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करण्यास सांगण्यात आलंय.
advertisement
पूजा खेडकरांची 17 कोटींची संपत्ती
पूजा खेडकर यांच्या नावावर तब्बल 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसंच त्यांनी दिलेल्या ओबीसी नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेटवरही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पूजा खेडकर चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या/पुणे/
IAS Pooja Khedkar : आयएस पूजा मॅडमचा नवीन 'कार'नामा; जॉईन व्हायच्या आधीच... धक्कादायक WhatsApp चॅट समोर!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement