advertisement

Weather Update : राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, Video

Last Updated:

4 एप्रिल रोजी देखील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. 

+
News18

News18

मुंबई : गेल्या 3 दिवसांत राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. 4 एप्रिल रोजी देखील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ राज्यातील सर्व जिल्ह्यांना 4 एप्रिलसाठी हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.
advertisement
4 एप्रिल रोजी मुंबईत पावसाची शक्यता नाही. तेथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईत दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील 24 तासांपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात होणार आहे.
पुण्यात 4 एप्रिलला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील 24 तासांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
छत्रपती संभाजी नगरमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 4 एप्रिलला त्याठिकाणी दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील 2 दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नाशिकमध्ये 4 एप्रिलला अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर तेथील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत नाशिकमधील तापमानात ही वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
नागपूरमध्ये 4 एप्रिलला सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत नागपूरमधील तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यातील एकंदरित तापमान आणि हवामानाची स्थिती बघता असे लक्षात येते की, पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढील 24 तासांत राज्यातील पावसाचे सावट गायब होऊन तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळीकडे दमट वातावरण निर्माण होऊ शकते. अशात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Weather Update : राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, Video
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement