advertisement

स्मार्ट सिटी गेली हवेत! छत्रपती संभाजीनगरात पाणीच नाही, धरण उशाला असून कोरड घशाला!

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा दिवसाला पाणी मिळत आहे. यामुळे आज नागरिकांनी पाणीपुरवठा कार्यालयावर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर :  राज्यात कडाक्याचं ऊन आता पडत आहे. सध्याला सर्वच ठिकाणी पाणी प्रश्न हा निर्माण झालेला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जायकवाडी हे मोठे धरण असून धरण असून यातून जालना, छत्रपती संभाजीनगर, खाली नांदेड पर्यंत पाणीपुरवठा केला जातो. परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये दहा दिवसाला पाणी मिळत आहे. यामुळे आज नागरिकांनी पाणीपुरवठा कार्यालयावर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.
स्मार्ट सिटी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्याला शहरामध्ये दहा ते बारा दिवसाआड पाणी हे नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. वेळेवर पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागते आणि त्यासोबतच पिण्यासाठी जारचे पाणी घ्यावे लागते. त्यामुळे महिलांना त्याचबरोबर सर्वांना त्याचा खूप त्रास होत आहे. यामुळे शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेचा कार्यालयात जाऊन हे आंदोलन केलेलं आहे.
advertisement
'आम्ही पालकमंत्र्यांना शंभर ते दीडशे वेळा फोन केलेला आहेपण त्यांनी आम्हाला कुठलाच रिस्पॉन्स दिलेला नाहीये. तसंच आम्हाला, आमच्या भगिनींना याचा खूप त्रास होत आहे. पाण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे हे द्यावे लागत आहेत. जिल्ह्यात एवढे मोठे धरण असून देखील याचा काही एक उपयोगात शहरातील नागरिकांना होत नाही. आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. पण या ठिकाणी कुठलाच महानगरपालिकेचा अधिकारी हा उपस्थित नाहीये याची खंत आहे', असं नागरिकाने सांगितलं.
advertisement
'आम्हाला पाणी मिळत नाहीयामुळे आमचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आम्हाला प्रत्येक वेळेस पाणी विकत घ्यावे लागत आहेआम्ही जो महानगरपालिकेचा नळपट्टी भरतो ती आम्ही कशासाठी भरतोपाणी यावे यासाठी भरतोपण महानगरपालिका आम्हाला वेळेवर पाणी सोडत नाहीयामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत. तर आम्हाला वेळेवर पाणी द्यावं', अशी आमची मागणी आहे असंही नागरिकांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
स्मार्ट सिटी गेली हवेत! छत्रपती संभाजीनगरात पाणीच नाही, धरण उशाला असून कोरड घशाला!
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement