advertisement

Pune Airport : पुणेकरांनो, तिकीट काढलंय? आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेत इंडिगोचा 'खो'; या मार्गावरची विमानसेवा रद्द

Last Updated:

प्रसिद्ध विमान कंपनी 'इंडिगो'ने आपल्या आगामी उन्हाळी हंगामातील पुणे-बँकॉक ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणेकरांच्या बँकॉक ट्रिपला 'ब्रेक'
पुणेकरांच्या बँकॉक ट्रिपला 'ब्रेक'
पुणे : थायलंडच्या सहलीचं नियोजन करणाऱ्या पुणेकरांसाठी एक वाईट बातमी आहे. प्रसिद्ध विमान कंपनी 'इंडिगो'ने आपल्या आगामी उन्हाळी हंगामातील पुणे-बँकॉक ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकातून इंडिगोने या मार्गावरील बुकिंग पूर्णपणे बंद केले असून, यामुळे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला मोठा धक्का बसला आहे.
सेवा रद्द करण्याचे कारण काय?
इंडिगोने या निर्णयामागे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. कंपनीने केवळ 'कामकाजातील बदल' असे उत्तर दिले आहे. मात्र, हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या मार्गावर प्रवाशांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नव्हता. सततच्या कमी प्रतिसादामुळे ही सेवा चालवणे कंपनीला व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांनी या सेक्टरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
advertisement
प्रवाशांना बसणार दुहेरी फटका
पर्यायांचा अभाव: आता पुण्याहून बँकॉकला जाण्यासाठी केवळ 'एअर इंडिया एक्सप्रेस' ही एकच कंपनी उपलब्ध असेल. त्यामुळे, या मार्गावर एकाच कंपनीची मक्तेदारी निर्माण झाल्यामुळे विमान तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढतील अशी अपेक्षा होती, मात्र चालू सेवा बंद पडणे हे पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी चिंताजनक आहे.
advertisement
तज्ज्ञांचं मत काय?
हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी सांगितलं की, "विमान कंपन्या प्रत्येक हंगामात प्रवाशांच्या प्रतिसादाचा आढावा घेतात. जर एखाद्या मार्गावर पुरेसे प्रवासी मिळत नसतील, तर व्यावसायिक कारणास्तव सेवा रद्द केली जाते. कदाचित ही कंपनी आता दुसऱ्या फायदेशीर मार्गावर आपली विमाने वळवेल."
सध्या पुणे विमानतळावरून दुबई, अबुधाबी आणि बँकॉक या तीनच आंतरराष्ट्रीय शहरांसाठी सेवा उपलब्ध आहे. इंडिगोच्या या निर्णयामुळे पर्यटनासाठी बँकॉकला जाणाऱ्या पुणेकरांच्या खिशाला आता मोठी कात्री लागण्याची चिन्हे आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Airport : पुणेकरांनो, तिकीट काढलंय? आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेत इंडिगोचा 'खो'; या मार्गावरची विमानसेवा रद्द
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement