Pune Crime : बंडू आंदेकरच्या तिसऱ्या पिढीची गुन्हेगारीत एन्ट्री! गणेश काळेच्या हत्येमागील मास्टरमाईंड कोण? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Last Updated:

Pune Crime Ganesh Kale Murder : आंदेकर टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. आता त्याच पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ गणेश काळेची हत्या करण्यात आली होती.

Pune Gang War, Ganesh Kale Murder
Pune Gang War, Ganesh Kale Murder
Pune Gang War, Ganesh Kale Murder : पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणली होती. समीर काळे हा सध्या कारागृहात असून त्याचा भाऊ गणेश काळे हा आज दुपारच्या सुमारास कोंढवा भागातील खडी मशीन चौकातील पेट्रोल पंपापासून रिक्षा घेऊन जात होता. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गणेश काळे वर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. अशातच आता ही हत्या देखील गँग वॉरमधून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पेट्रोल पंपाजवळ गणेश काळेची हत्या

काही दिवसांपूर्वी पुण्यातील नाना पेठ परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुनातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा खून करण्यात आला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीला अटक केली होती. त्याचबरोबर संपूर्ण आंदेकर टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. आता त्याच पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ गणेश काळेची हत्या करण्यात आली होती.
advertisement

चारही आरोपी स्वराज वाडेकर याचे मित्र

पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यानंतर काही आरोपींच्या मुसक्या आवळ्या आहे. पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी हे आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि बंडू आंदेकरचा नातू स्वराज वाडेकर याचे मित्र आहेत. त्यामुळे गणेश काळेचा खूनही वनराजच्या खुनाचा बदला असल्याचं स्पष्ट झालं आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. गुन्हे शाखा आणि परिमंडळ पाच यांची मिळून एकूण दहा पथके आरोपींचा शोध घेत होती.
advertisement

साताऱ्याच्या दिशेने पळून जाताना चारही आरोपींना अटक

दरम्यान, गणेश कोमकरची खून झालेल्या घटना स्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमांतून देखील आरोपींचा शोध घेतला जात असताना, साताऱ्याच्या दिशेने पळून जाणार्‍या चार आरोपींना खेड शिवापूर येथून अमन शेख,अरबाज पटेल यांच्यासह दोन अल्पवयीन अशी एकूण चार जणांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : बंडू आंदेकरच्या तिसऱ्या पिढीची गुन्हेगारीत एन्ट्री! गणेश काळेच्या हत्येमागील मास्टरमाईंड कोण? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement