Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! कोथरूडमध्ये घरफोडीची आणखी एक घटना, लाखोंचे दागिने लंपास

Last Updated:

पुण्यातील कोथरूड येथील आझादनगर भागात घरफोडीची मोठी घटना घडली आहे. 'सुखाई कॉम्प्लेक्स'मधील एक कुटुंब परगावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधली

पुण्यात घरफो़डी (AI Image)
पुण्यात घरफो़डी (AI Image)
पुणे : पुणे शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी चोरटे बंद घरांना लक्ष्य करत आहेत. आता आणखी एक घटना समोर आली आहे. यात पुण्यातील कोथरूड सारख्या उच्चभ्रू परिसरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडली आहे. आझादनगर भागातील एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमधील आझादनगर येथील 'सुखाई कॉम्प्लेक्स' सोसायटीत वास्तव्यास आहेत. ५ डिसेंबर रोजी ते काही कामानिमित्त घराला कुलूप लावून परगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून त्यातील सहा लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला.
advertisement
तक्रारदार घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. पोलीस सध्या सोसायटीतील आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत असून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
पुण्यात इंजिनिअरची फसवणूक
दुसऱ्या एका घटनेत पुण्यातील हिंजवडी परिसरात एका आयटी इंजिनिअरची फसवणूक झाली आहे. घरगुती सामान झारखंडला पोहोचवण्याच्या बहाण्याने सुमारे २३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'EIE मार्केट प्लेस टेक्नॉलॉजी' या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी सामान लंपास करून विश्वासघात केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! कोथरूडमध्ये घरफोडीची आणखी एक घटना, लाखोंचे दागिने लंपास
Next Article
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray: जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?
जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदे
  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.

  • जागा वाटपात स्थानिक पातळीवर काही जागांवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आग्रही आह

  • शिवसेना ठाकरे गटाच्या सगळ्या शाखा प्रमुखांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे.

View All
advertisement