बायकोच्या इशाऱ्यावर नाचतात 'या' 3 मूलांकाचे पुरुष, प्रत्येक गोष्टीत निभावतात पत्नीची साथ!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
लग्नानंतर पती-पत्नीचे नाते हे विश्वासावर आणि एकमेकांच्या आदरावर टिकून असते. काही पती स्वभावाने थोडे कठोर असतात, तर काही आपल्या पत्नीच्या भावनांचा आणि निर्णयांचा मनापासून सन्मान करतात. अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेले पुरुष हे 'आदर्श पती' सिद्ध होतात.
Numerology : लग्नानंतर पती-पत्नीचे नाते हे विश्वासावर आणि एकमेकांच्या आदरावर टिकून असते. काही पती स्वभावाने थोडे कठोर असतात, तर काही आपल्या पत्नीच्या भावनांचा आणि निर्णयांचा मनापासून सन्मान करतात. अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेले पुरुष हे 'आदर्श पती' सिद्ध होतात. हे लोक केवळ पत्नीची 'हो ला हो' मिळवत नाहीत, तर तिच्या प्रत्येक सुखाची आणि गरजेची काळजी घेतात.
मूलांक 2 (जन्मतारीख 2, 11, 20, 29): मूलांक 2 चा स्वामी 'चंद्र' आहे. चंद्र हा शीतलतेचा आणि भावनांचा प्रतीक आहे. यामुळे या मूलांकाचे पती अत्यंत संवेदनशील आणि शांत स्वभावाचे असतात. ते आपल्या पत्नीच्या शब्दाचा कधीही अनादर करत नाहीत. पत्नीला काय हवे, काय नको हे ते तिच्या न सांगता ओळखतात. या लोकांसाठी पत्नीचा आनंद हेच सर्वस्व असते आणि ते वादापेक्षा शांततेला अधिक महत्त्व देतात.
advertisement
मूलांक 5 (जन्मतारीख 5, 14, 23): या मूलांकाचा स्वामी 'बुध' आहे. हे लोक बुद्धीने चाणाक्ष असले तरी नात्यात खूप लवचिक असतात. पत्नीशी त्यांचे मित्रत्वाचे नाते असते. 'पत्नी आनंदी तर घर आनंदी' या सूत्रावर त्यांचा विश्वास असतो. ते आपल्या पत्नीच्या करिअरला आणि निर्णयांना पूर्ण पाठिंबा देतात. पत्नीच्या सांगण्यावरून स्वतःच्या सवयी बदलण्यातही त्यांना कमीपणा वाटत नाही.
advertisement
मूलांक 6 (जन्मतारीख 6, 15, 24): अंकशास्त्रानुसार 6 हा अंक 'शुक्र' ग्रहाचा आहे, जो प्रेम आणि सौंदर्याचा कारक आहे. मूलांक 6 चे पती सर्वात जास्त रोमँटिक आणि समर्पित असतात. ते आपल्या पत्नीला राणीसारखे वागवतात. घरातील कामे असो वा बाहेरचे निर्णय, ते पत्नीचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊल टाकत नाहीत. दिलेला शब्द पाळणे हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे, ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी असते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 1:26 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
बायकोच्या इशाऱ्यावर नाचतात 'या' 3 मूलांकाचे पुरुष, प्रत्येक गोष्टीत निभावतात पत्नीची साथ!








