advertisement

Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी भरून ठेवा; गुरूवारी शहरातील या महत्त्वाच्या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Last Updated:

गुरुवारी (१२ फेब्रुवारी) संपूर्ण दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पाणी उशिराने आणि कमी दाबाने येण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे.

गुरुवारी दक्षिण पुण्यात पाणीपुरवठा बंद
गुरुवारी दक्षिण पुण्यात पाणीपुरवठा बंद
पुणे: पुण्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या टप्पा क्रमांक एकमध्ये देखभाल आणि दुरुस्तीचे अत्यंत तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे गुरुवारी (१२ फेब्रुवारी) संपूर्ण दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पाणी उशिराने आणि कमी दाबाने येण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे.
नेमकी काय दुरुस्ती होणार?
वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीवर 'बंद प्लेट' बसवणे आणि तीन नवीन 'किऑस्क' बसवण्याचे तांत्रिक काम गुरुवारी केले जाणार आहे. या कामामुळे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पंपिंगचा पुरवठा पूर्णपणे थांबवावा लागणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा मुख्य परिसर:
सिंहगड रस्ता परिसर: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, आंबेगाव खुर्द व बुद्रुक.
सातारा रस्ता व कात्रज भाग: धनकवडी, कात्रज गावठाण, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, संतोषनगर, बालाजीनगर, सुखसागर नगर.
advertisement
दक्षिण पुणे आणि अन्य भाग: कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर २, आंबेडकरनगर, टिळकनगर, दाते स्टॉप, सच्चाई माता टाकी, वंडर सिटी, मोरेबाग, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, वरखेडेनगर आणि प्रभाग ४१.
नागरिकांसाठी आवाहन:
गुरुवारी दिवसभर पाणी नसल्यामुळे आणि शुक्रवारी पाणी कमी दाबाने येणार असल्याने नागरिकांनी बुधवारीच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा. महापालिकेच्या या नियोजित कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी भरून ठेवा; गुरूवारी शहरातील या महत्त्वाच्या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement