advertisement

Pune Crime: तेल खरेदी करायला गेली पुण्यातील महिला अन् लागला चुना; 'या' एका चुकीमुळे क्षणात गमावले 2 कोटी 54 लाख

Last Updated:

पुण्यातील एका महिलेला तब्बल २ कोटी ५४ लाख ८४ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील महिलेला गंडा (AI Image)
पुण्यातील महिलेला गंडा (AI Image)
पुणे : पुण्यातून फसवणुकीची एक अजब घटना समोर आली आहे. यात कच्च्या तेलाच्या व्यापारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका महिलेला तब्बल २ कोटी ५४ लाख ८४ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली दुबईतील कनेक्शन वापरून सायबर भामट्यांनी या महिलेला असा काही 'चुना' लावला की, तिने आयुष्याची मोठी पुंजी गमावली आहे.
दुबई कनेक्शन आणि नफ्याचे स्वप्न
मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेल्या महिलेला कच्चे तेल खरेदी-विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास प्रचंड परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले होते. या कटात बाणेर पोलिसांनी दुबईत वास्तव्य करणाऱ्या तिघांसह एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पूनम विशाल शेळके, विनायक महादेव शेळके आणि सुरेखा महादेव शेळके (सर्व रा. दुबई) यांच्यासह अन्य सहा जणांचा समावेश आहे.
advertisement
अशी झाली फसवणूक
आरोपींनी 'अल्फा माइंड सोल्युशन्स' आणि 'इन्फोसेस सर्व्हिसेस' यांसारख्या कंपन्यांच्या नावाचा वापर करून महिलेचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला थोडे पैसे गुंतवण्यास सांगून त्यांना नफ्याचे खोटे आकडे दाखवण्यात आले. तेलाच्या व्यापारात मोठी तेजी असल्याचे भासवून आरोपींनी महिलेकडून टप्प्याटप्प्याने २ कोटी ५४ लाखांहून अधिक रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतली. मात्र, जेव्हा महिलेने परतावा मागितला, तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केली आणि फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
advertisement
पोलीस कारवाई आणि तपास
याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींचे धागेदोरे दुबईपर्यंत असल्याने पोलीस आता आंतरराष्ट्रीय पातळीवर तपासाची चक्रे फिरवत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: तेल खरेदी करायला गेली पुण्यातील महिला अन् लागला चुना; 'या' एका चुकीमुळे क्षणात गमावले 2 कोटी 54 लाख
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement