advertisement

Pune Crime : पुण्यातील देवीच्या मंदिरात केली चोरी; चोरट्याला 24 तासात मिळालं कर्माचं फळ, काय घडलं?

Last Updated:

भरवस्तीतील मंदिरात झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यातील मंदिरात चोरी (AI Image)
पुण्यातील मंदिरात चोरी (AI Image)
पुणे : मंदिरातील देवचोरीच्या घटनांनी भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच, पुण्यात एका चोरट्याला देवीचा मुकुट चोरणे चांगलेच महागात पडले आहे. येरवडा परिसरातील यल्लम्मा देवीच्या मंदिरातून चांदीचा मुकुट लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. चोरीला गेलेला मौल्यवान मुकुटही पोलिसांनी हस्तगत केला असून, शिवराम पापा काळे (वय ४७, रा. सुरक्षानगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी काय होती घटना?
शुक्रवारी (२० फेब्रुवारी) येरवडा येथील प्रसिद्ध यल्लम्मा देवीच्या मंदिरात ही चोरी झाली होती. देवीचा ७०० ग्रॅम वजनाचा आणि १ लाख ८४ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट चोराने शिताफीने चोरून नेला होता. भरवस्तीतील मंदिरात झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
असा लागला चोरट्याचा छडा
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीत मिळालेल्या धागदोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी शिवराम काळे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
भक्ती अन् कायद्याचा विजय
अवघ्या २४ तासांत मुकुट चोरणाऱ्याला अटक करून पोलिसांनी आपला दरारा सिद्ध केला आहे. मुकुट पुन्हा मंदिरात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलिसांनी मुकुट जप्त केला असून आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यातील देवीच्या मंदिरात केली चोरी; चोरट्याला 24 तासात मिळालं कर्माचं फळ, काय घडलं?
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement