'...नाहीतर तुझा जीव घेईन', पुण्यात कुख्यात गुंड टिपू पठाणवर गुन्हा दाखल

Last Updated:

Crime in Pune: पुण्यातील कुख्यात गुंड टिपू पठाणवर पुणे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात संघटीत गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहेत. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने आयुष कोमकरची हत्या केली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या केली होती. यानंतर निलेश घायवळ टोळीने देखील दहशत माजवण्यासाठी कोथरुड परिसरात एकावर गोळीबार केला. तर दुसऱ्यावर कोयत्याने वार केले. पोलीस सातत्याने गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी कार्यरत आहे. तरीही गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नाही, अशी स्थिती आहे.
या सगळ्या घडामोडीनंतर आता पुण्यातील आणखी एक टोळी चर्चेत आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड टिपू पठाणवर पुणे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जागेवर ताबा मारल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.
टिपू उर्फ रिझवान पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. आता एका जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पठाणने संबंधित जागेवर ताबा मारून जागा मालकाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. जागेवरील ताबा सोडण्यासाठी त्याने जागा मालकाकडे 25 लाख रुपये मागितले होते.
advertisement
या प्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिझवान उर्फ टिपू पठाण याच्यासह एकूण 13 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे आयुष कोमकर हत्या प्रकरणात देखील टिपू पठाण टोळीचं नाव समोर आलं होतं. या टोळीनेच आंदेकर टोळीला शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आता पठाणविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'...नाहीतर तुझा जीव घेईन', पुण्यात कुख्यात गुंड टिपू पठाणवर गुन्हा दाखल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement