advertisement

दोन दिवसांनी महाशिवरात्री! पण पिरियड्स आले तर उपवास करावा की नाही? शास्त्र काय सांगत?

Last Updated:

महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या भक्तीचा सर्वात मोठा दिवस आहे. मात्र, अनेक महिलांच्या मनात एक मोठा संभ्रम असतो की, जर महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी आली, तर उपवास करावा की नाही?

News18
News18
Mahashivratri 2026 : महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या भक्तीचा सर्वात मोठा दिवस आहे. मात्र, अनेक महिलांच्या मनात एक मोठा संभ्रम असतो की, जर महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी आली, तर उपवास करावा की नाही? शास्त्रात याबद्दल काही विशेष नियम आणि मार्गदर्शन दिले आहे. या दिवशी मासिक पाळी आली तर नेमकं काय करावं आणि उपवास करू की नये हे जाणून घेऊयात.
उपवास करावा की नाही?
हो, मासिक पाळी सुरू असतानाही तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास नक्कीच करू शकता. उपवास ही शरीराची आणि मनाची तपश्चर्या आहे. शास्त्रानुसार, शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे भक्तीमध्ये कोणताही अडथळा येत नाही. जर तुम्ही आधीच उपवासाचा संकल्प केला असेल आणि मध्येच पाळी आली, तर उपवास अर्धवट सोडू नका, तो पूर्ण करावा.
मूर्तीपूजा आणि स्पर्शाबाबत नियम
मासिक पाळी दरम्यान सर्वात महत्त्वाचा नियम हा आहे की, तुम्ही देवाची मूर्ती, शिवलिंग किंवा पूजेच्या साहित्याला स्पर्श करू नये. तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही किंवा घरच्या देव्हाऱ्याजवळ बसून प्रत्यक्ष पूजा करू शकत नाही. मात्र, तुमच्या वतीने कुटुंबातील एखादा सदस्य किंवा पती शिवलिंगावर अभिषेक करू शकतात.
advertisement
मानसिक पूजा
देव हा भावाचा भुकेला असतो. जरी तुम्ही देवाला स्पर्श करू शकत नसाल, तरी तुम्ही 'मानसिक पूजा' करू शकता. डोळे मिटून भगवान शंकराचे ध्यान करणे, मनातल्या मनात 'ओम नमः शिवाय' किंवा 'महामृत्युंजय मंत्राचा' जप करणे हे प्रत्यक्ष पूजेइतकेच फलदायी मानले जाते. भक्तीसाठी शरीरापेक्षा मनाची शुद्धता अधिक महत्त्वाची असते.
कथा श्रवण आणि नामस्मरण
मासिक पाळीत तुम्ही महाशिवरात्रीची कथा ऐकू शकता, शिवभोजने किंवा स्तोत्रे मोबाईलवर किंवा टीव्हीवर ऐकू शकता. यामुळे तुम्हाला पूजेचे पूर्ण पुण्य मिळते. तुम्ही लांबूनच शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकता, जिथे स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
advertisement
आरोग्याची काळजी घ्या
मासिक पाळीत अनेक महिलांना पोटदुखी, कंबरदुखी किंवा अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी जर तुम्हाला कडक उपवास करणे शक्य नसेल, तर शरीराला त्रास देऊन उपवास करू नका. तुम्ही फलाहार, दूध किंवा साबुदाणा घेऊन 'फराळी उपवास' करू शकता. महादेवाला भक्तांचे कष्ट नको, तर त्यांची श्रद्धा हवी असते.
विधीवत पूजा कधी करावी?
असे मानले जाते की मासिक पाळीच्या पाचव्या दिवसानंतर केस धुवून शुद्ध झाल्यावर महिला पुन्हा विधीवत पूजा करू शकतात. जर तुमची पाळी महाशिवरात्रीच्या दिवशीच सुरू झाली असेल, तर त्या दिवशी केवळ उपवास आणि नामस्मरण करा आणि पाळी संपल्यानंतर एखाद्या सोमवारी मंदिरात जाऊन महादेवाचा अभिषेक करा.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
दोन दिवसांनी महाशिवरात्री! पण पिरियड्स आले तर उपवास करावा की नाही? शास्त्र काय सांगत?
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement