बापानंतर आता मुलाचीही शिकार केली... 991 इंटरनॅशनल विकेट घेणाऱ्या दिग्गजाने इतिहास घडवला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतामध्ये सध्या आयपीएलचा धमाका सुरू आहे. टी-20 क्रिकेटच्या या थरारामध्ये रोजच नवनवे विक्रम घडत आहेत, त्यातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 991 विकेट घेणाऱ्या दिग्गज खेळाडूने नवा इतिहास घडवला आहे.
मुंबई : भारतामध्ये सध्या आयपीएलचा धमाका सुरू आहे. टी-20 क्रिकेटच्या या थरारामध्ये रोजच नवनवे विक्रम घडत आहेत, त्यातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 991 विकेट घेणाऱ्या दिग्गज खेळाडूने नवा इतिहास घडवला आहे. 43 वर्षांच्या या क्रिकेटपटूने बाप आणि मुलाची विकेट घेतली आहे. 2005 साली या बॉलरने ज्या खेळाडूची विकेट घेतली त्याच्याच मुलाची विकेट 2026 साली घेतली आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये झालेल्या या अनोख्या विक्रमाची चर्चा सुरू आहे.
इंग्लंडचा माजी फास्ट बॉलर जेम्स अंडरसन हा सध्या काऊंटी क्रिकेट खेळत आहे. 43 वर्षांच्या जेम्स अंडरसनची कारकिर्द इतकी मोठी आहे की त्याने लहान वयात ज्या खेळाडूची विकेट घेतली त्याचा मुलगा आता अंडरसनविरुद्ध खेळत आहे. इतकच नाही तर अंडरसनने या मुलाचीही विकेट घेतली आहे.
इंग्लंडच्या काऊंटीमध्ये लँकशायर आणि नॉर्थम्पटशायर यांच्यातल्या सामन्यात जेम्स अंडरसन लँकशायरचा कर्णधार आहे. या सामन्यात अंडरसनने नॉर्थम्पटशायरचा खेळाडू जेम्स सेल्स याची विकेट घेतली. या सामन्यात अंडरसनची टीम लँकशायरने पहिले बॅटिंग करत 384 रन केले, या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नॉर्थम्पटशायरने 9 विकेट गमावून 215 रन केले, यात अंडरसनने एकट्याने 5 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
आधी बाप मग मुलाची विकेट
जेम्स अंडरसनने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 13 ओव्हरमध्ये 64 रन देऊन 5 विकेट घेतल्या. यातली एक विकेट अशा खेळाडूची होती ज्याच्या वडिलांनाही अंडरसनने आऊट केलं होतं. अंडरसनने जेम्स सेल्सला 2 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
जेम्स सेल्स हा नॉर्थम्पटशायरचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड सेल्सचा मुलगा आहे. 2026 साली अंडरसनने जेम्स सेल्सची विकेट घेतली, पण 21 वर्षांपूर्वी 2005 साली त्याने जेम्सचे वडील डेव्हिड सेल्सचीही विकेट घेतली होती. आधी बाप आणि आता मुलाची विकेट घेऊन जेम्स अंडरसनने क्रिकेटमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे.
advertisement
अंडरसन इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त
जेम्स अंडरसन इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. अंडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 991 विकेट घेतल्या. अंडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर आणि सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा बॉलर आहे. अंडरसनच्या नावावर टेस्टमध्ये 704, वनडेमध्ये 269 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 18 विकेट आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 5:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बापानंतर आता मुलाचीही शिकार केली... 991 इंटरनॅशनल विकेट घेणाऱ्या दिग्गजाने इतिहास घडवला!







