Solpaur Crime : 'तु काय इथला डॉन हाय का?', साऊंड सिस्टिमचा आवाज कमी वाढवल्याने तुफान राडा! 18 वर्षाच्या पोराला बेक्कार मारहाण
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Solpaur Crime Sound System Volume : आरोपींनी प्रणयला गाठलं आणि "तू आम्हाला आवाज कमी करायला सांगणारा इथला डॉन आहेस का?" असे म्हणून शिवीगाळ सुरू केली.
Solpaur Crime News : सोलापूरमध्ये साऊंड सिस्टिमचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून एका 18 वर्षीय तरुणाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीयनगर आणि देसाईनगर परिसरात 3 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. वारंवार सूचना देऊनही आवाज कमी न केल्याने वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झालं अन् एकच राडा झाल्याचं पहायला मिळालं. प्रणय संजय अलकुंटे असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तु इथला डॉन आहेस का?
प्रणय आपल्या घरासमोर उभा असताना आरोपींनी त्याला गाठले आणि "तू आम्हाला आवाज कमी करायला सांगणारा इथला डॉन आहेस का?" असे म्हणून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर भांडणं वाढली. पोलिसांनी याप्रकरणी अनिल कांबळे, जयभीम वाघमारे, विरेश पटणे आणि सूरज नावाच्या चार व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
प्रणयच्या बरगडीला गंभीर दुखापत
या वादादरम्यान जयभीम वाघमारे याने वायरने, तर सूरजने लोखंडी पट्टीने प्रणयला मारहाण केली. मारहाण एवढी भीषण होती की, विरेश पटणे याने दगड भिरकावल्यामुळे प्रणयच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपी अनिल कांबळे याने जाताना "तुला बघून घेतो" अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
advertisement
अद्याप अटक नाही
दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पोलीस हवालदार कांबळे या घटनेची अधिक चौकशी करत आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 5:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solpaur Crime : 'तु काय इथला डॉन हाय का?', साऊंड सिस्टिमचा आवाज कमी वाढवल्याने तुफान राडा! 18 वर्षाच्या पोराला बेक्कार मारहाण






