घरातील देवघरात नेमके किती आणि कोणते देव असावेत? पाहा महत्त्वाची माहिती

Last Updated:

प्रत्येकाच्या घरात देवघर असते, पण त्यामध्ये किती आणि कोणते देव असावे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते.

+
News18

News18

पुणे, 2 ऑक्टोबर : देवघर ही घरातील महत्त्वाची जागा आहे. प्रत्येकाच्या घरात देवघर असते, पण त्यामध्ये किती आणि कोणते देव असावे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते. काही जण यात्रेला गेल्यावर त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती घेऊन येतात आणि देवघरात ठेवतात. ही पद्धत योग्य आहे का? देवघरात देवांची संख्या किती असावी? याची माहिती पुण्यातले ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिलीय.
घरातील देव हे एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे पूर्वापार दिले जातात. काही नवीन देव आपण देवघरात ठेवण्यासाठी घेतो. काहींच्या देवघरात देवांची संख्या जास्त असते. पण, पुढच्या पिढीमध्ये नित्य देवपूजा होण्यासाठी आवश्यक तेवढ्या मूर्ती असणे गरजेचे आहॆ. मूर्तींची, देवांची संख्या ही मर्यादित असावी असे शास्त्र सांगते. हिंदू धर्म शास्त्राचा विचार जर केला तर देवघरामध्ये दोन शिवलिंग, दोन शंख, दोन शाळीग्राम, तीन देवी, तीन गणपती यांचे पूजन करू नये, अशी माहिती धर्मसिंधू या ग्रंथात दिल्याचं जोशी यांनी सांगितलं.
advertisement
कोणते देव असावेत?
देवघरात पांडुरंग, बाळकृष्‍ण, किंवा श्रीराम यापैकी एकच मूर्ती असावी. देवी स्वरुप म्हणून महालक्ष्मी, दुर्गा, अन्नपूर्णा यांच्यापैकी एक मूर्ती असावी. देवपूजेत पंचायतनामध्येमध्ये गणपती, देवी, विष्णू, महादेव, यांची एक एक मूर्ती ठेवावी. तसेच शंख,घंटा, कुळ धर्मातील कुल देवी देवतांचे टाक देवघरात असावेत.
advertisement
आपल्या घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी ही माहेर वरून बाळकृष्ण व अन्नपूर्णा हॆ दोन देव आणते. सून आल्यावर तिच्या माहेरच्या या दोन देवाचे स्थान देवघरात पक्के आहे. काही ठिकाणी पितरांचे टाक बनवले जातात ते टाक देवघरात ठेवू नये, अशी माहिती जोशी यांनी दिली.
advertisement
आपल्याकडे देवघरात प्रमाणापेक्षा जास्त मूर्ती, देव, झाले असतील. तर ते एका डब्यात बंद करून तो डबा देवघरात ठेवावा. त्या डब्यातील देव मंगल कार्य, सण-उत्सव अशा वेळेस बाहेर काढून व्यवस्थित स्वच्छ करून त्या दिवशी त्याची पूजा करावी. आपल्या देवघरात वरील सांगितल्या प्रमाणे आवश्यक तेवढेच देव ठेवावे.
advertisement
देवघरामध्ये ग्रामदैवत, श्रीदत्त, बालाजी, अशा प्रकारचे फोटो देवघरात ठेवावेत. आपल्या कार्या निमित्त किंवा इतर वेळेस आपल्याला भेट म्हणून मिळालेल्या मूर्ती, फोटो, देव घरात ठेवू नयेत. त्यामुळे देवघरात आवश्यकतेपेक्षा जास्त फोटोची संख्या वाढते, अशी माहिती जोशी यांनी दिली.
मराठी बातम्या/अध्यात्म/
घरातील देवघरात नेमके किती आणि कोणते देव असावेत? पाहा महत्त्वाची माहिती
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement