Pitradosh: पितृदोषामुळे घरात अशा अडचणी निर्माण होतात, हे संकेत ओळखून करा उपाय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Pitrudosh upay : पितृदोष असल्यास कोणत्या कोणत्या गोष्टी होतात आणि पितृ दोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत, याविषयी दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया.
मुंबई, 09 सप्टेंबर : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर धार्मिक नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार न केल्यास किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास पितृदोषाचा फटका कुटुंबातील सदस्यांसह अनेक पिढ्यांना सहन करावा लागतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोषामुळे कुटुंबात अडचणींची मालिका सुरू आहे. पितृदोष असेल तर काही लक्षणे दैनंदिन जीवनात दिसून येतात. पितृदोष असल्यास कोणत्या कोणत्या गोष्टी होतात आणि पितृ दोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत, याविषयी दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया.
पितृदोष असेल तर -
कुटुंबातील कोणाची तरी तब्येत खराब होत राहणे. उपचार करूनही कुटुंबातील काही सदस्य नेहमी आजारी असणे हे पितृदोषाचे कारण असू शकते.
वारंवार अपघात -
पितृदोषामुळे घरातील व्यक्तींचा वारंवार अपघात होऊ शकतो. यासोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व शुभ कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात.
कुटुंबातील एखादी व्यक्ती अविवाहित राहणे -
कुटुंबातील एखाद्याचे लग्न न होणे देखील पितृदोष असू शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती लग्नासाठी पात्र आहे, परंतु लग्न जमत नाही. याशिवाय कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जी लग्न करूनही घटस्फोट घेते किंवा काही कारणास्तव वेगळे राहते तो देखील पितृदोष असू शकतो.
advertisement
संतती सुख न मिळणे- पितृ दोषाच्या अशुभ प्रभावामुळे संतती सुखात बाधा येते. मूल असले तरी ते मंद, दुर्बल किंवा अपंग असते.
कुटुंबात कलह : धन-संपत्तीने भरलेले असूनही कुटुंबात एकता नसणे, अशांततेचे वातावरण राहणे ही पितृदोषाची लक्षणे आहेत. पितृदोषामुळे कुटुंबात नेहमी कलहाची परिस्थिती असते, त्यामुळे व्यक्ती मानसिक तणावाखाली असते.
advertisement
पितृदोषासाठी उपाय -
1. पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि भक्तिभावाने दान करावे.
2. संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावा. रोज शक्य नसेल तर पितृपक्षात अवश्य लावावा.
3. जर कुंडलीत पितृदोष असेल तर यासाठी कुमारी मुलीचे लग्न लावा. लग्न करता येत नसेल तर गरीब मुलीच्या लग्नात मदत करा.
4. पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी दक्षिण दिशेला पितरांचे चित्र ठेवा आणि रोज त्याचे स्मरण करा. यामुळे पितरांची नाराजी कमी होते आणि पितृदोषाचा प्रभावही कमी होऊ लागतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 03, 2023 9:34 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Pitradosh: पितृदोषामुळे घरात अशा अडचणी निर्माण होतात, हे संकेत ओळखून करा उपाय











