चुंबकासारखा आकर्षित होईल पैसा, फक्त हे ब्रेसलेट वापरा, किंमतही कमी पण फायदे अधिक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
पायराइट स्टोन असे या स्टोनचे नाव आहे. याला ब्रेसलेटच्या रुपात हातात घातले जाते.
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची, 30 नोव्हेंबर : पैशांची चणचण अनेकांना भासत असते. अशावेळी अनेकांच्या मनात विचार येतो की, अशी काही प्रक्रिया असावी, ज्यामुळे चुंबकासारखे धन येईल. तर आज आपण अशाच्या एका स्टोनबाबत जाणून घेणार आहोत, ज्या स्टोनचे ब्रेसलेट घालताच धन चुंबकासारखे तुमच्याजवळ येईल.
पायराइट स्टोन असे या स्टोनचे नाव आहे. याला ब्रेसलेटच्या रुपात हातात घातले जाते. झारखंडची राजधानी रांची येथील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य संतोष कुमार चौबे यांनी याबाबतची माहिती दिली. पायराइट विशेषतः पैसे आकर्षित करते. हे चुंबकासारखे पैसे आकर्षित करते आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचे काम करते. त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
advertisement
संतोष कुमार चौबे यांनी सांगितले की, हे पैसे आकर्षित करण्यासाठी काम करते. हा स्टोन सूर्याचे उपरत्न मानले जाते. तुम्ही ते घालताच तुमच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होऊ लागते. त्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळीच चमक दिसेल. तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला यश मिळेल. पैसे मिळवणे किंवा पैशाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण करणे, तुमच्यासाठी यापुढे मोठी गोष्ट असणार नाही.
advertisement
ते पुढे म्हणाले की, संपत्तीसोबत ते तुमच्यामध्ये धैर्य आणण्याचे काम करते. मोठे निर्णय घेताना तुम्हाला चिंता वाटणार नाही. तर, तुमची निर्णय घेण्याची क्षमता विकसित होईल आणि तुम्ही शेवटच्या क्षणी मोठे आणि योग्य निर्णय घेऊ शकाल. हे निर्णय तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळविण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पायराइट धारण केल्याने प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतात.
advertisement
किंमत किती -
संतोष म्हणाले की, या स्टोनची आणखी एक खासियत म्हणजे हा सर्वात स्वस्त आहे. पाचू, पुष्कराज किंवा नीलम यांचा विचार केला असता, तर त्याची मूळ किंमत लाखोंमध्ये आहे. त्यामुळे अनेक लोकांना हवे असूनही विकत घेता येत नाही. मात्र, तुम्हाला हे ब्रेसलेट फक्त 500 रुपयांमध्ये मिळू शकते. तसेच सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही व्यक्ती ते घालू शकते. हे स्टोन ब्रेसलेट घालण्यासाठी कुंडली दाखवण्याची गरज नाही.
advertisement
तुमच्या कुंडलीत सूर्य कमकुवत असो किंवा सूर्य बलवान असो, या दोन्ही स्थितींमध्ये तुम्ही हा स्टोन धारण करू शकता. त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
view commentsLocation :
Ranchi,Jharkhand
First Published :
November 30, 2023 12:23 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
चुंबकासारखा आकर्षित होईल पैसा, फक्त हे ब्रेसलेट वापरा, किंमतही कमी पण फायदे अधिक


