Chaitra Amavasya: सगळं घर पितृदोषानं हैराण झालंय? रविवारी चैत्र अमावस्येला या उपायांनी पूर्वज होतील तृप्त
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
vaishakha amavasya 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार घरात पितृदोष असल्यास अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. यासाठी पितृपक्षात किंवा अमावस्या तिथीला पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. सकाळी लवकर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे, त्यानंतर पूर्वजांना तर्पण द्यावं.
मुंबई : चैत्र महिन्याची अमावस्या तिथी रविवारी 27 एप्रिल रोजी आहे. अमावस्या तिथीला पूर्वजांचे श्राद्ध विधी करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार घरात पितृदोष असल्यास अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. यासाठी पितृपक्षात किंवा अमावस्या तिथीला पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. सकाळी लवकर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे, त्यानंतर पूर्वजांना तर्पण द्यावं. चैत्र अमावस्येला आपण पूर्वजांसाठी श्राद्ध करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी. ज्योतिष तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चैत्र अमावस्येच्या श्राद्ध नियमांविषयी जाणून घेऊ.
श्राद्ध करण्याचे नियम -
श्राद्धविधीमध्ये पितरांसाठी पिंड तयार करताना ८ घटकांचा वापर करावा. यासाठी तीळ, धान्य, पाणी, मध, धूप, दिवा, दूध आणि तूप वापरावे.
मासिक किंवा वार्षिक श्राद्ध करत असताना पूर्वजांसाठी नारळाच्या आकाराऐवढा पिंढ बनवावा. पितृपक्षात आवळ्याएवढ्या आकाराचा पिंड बनवावा.
श्राद्ध विधी दरम्यान सोने, चांदी, तांबे किंवा पितळेपासून बनवलेल्या भांड्यांचा वापर करा. केळीच्या पानांचा वापर करणेही शक्यतो टाळावे. पूर्वजांसाठी असलेला श्राद्धाचा नैवेद्य मातीच्या भांड्यात ठेवू नये.
advertisement
श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणांनाचे आदरातिथ्य करावे, ते घरी आल्यावर पती-पत्नीने त्यांच्या पायावर पाणी घालावे. नंतर आत आणून त्यांना भोजन द्यावे. या धार्मिक विधींमध्ये पत्नीने पतीच्या उजवीकडे उभे रहावे. या दिवशी कोणा दीन-दुबळ्यांचा अवमान करू नये.
advertisement
श्राद्धाच्या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने पान खाऊ नये, तेल लावणे टाळावे, उपवास केला असल्या लैंगिक संबंध ठेवू नये. दुसऱ्यासाठी वाढलेले अन्न खाऊ नये. श्राद्धात लोखंडी भांडी अजिबात वापरू नयेत. पूर्वज फक्त लोखंड पाहून नाराज होऊ शकतात. श्राद्धादरम्यान मांस खाऊ नये, मद्यापन करू नये.
श्राद्धासाठी बेलपत्र, केवडा, लाल आणि काळी फुले वापरू नये. तीव्र वास असलेली फुलेही वापरू नये. श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने त्यादिवशी डाळी, वांगी, तूर, गाजर, दुधी भोपळा, कांदा, लसूण, हिंग, जिरे, काळे मीठ, मिरची, शेंगदाणे, हरभरा इत्यादी गोष्टी खाणे टाळावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 25, 2025 11:32 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Chaitra Amavasya: सगळं घर पितृदोषानं हैराण झालंय? रविवारी चैत्र अमावस्येला या उपायांनी पूर्वज होतील तृप्त