नितीन चंद्रकांत देसाईंची अनोखी संकल्पना, आता पुण्यातच होणार चारधाम यात्रा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून आता पुण्यातच चारधाम यात्रा करता येणार आहे.
पुणे, 24 सप्टेंबर: गणेश उत्सव म्हटलं की देखावे आलेच. पुण्यातील गणेशोत्सवाला हलते देखावे, जिवंत देखाव्यांची मोठी परंपरा आहे. यामध्ये सामाजिक विषयावर माहिती देणारे देखावेही पाहायला मिळतात. पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाने यंदा चारधाम यात्रेवर देखावा सादर केला आहे. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची ही संकल्पना आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते विविध संकल्पना या मंडळाच्या माध्यमातून मांडत आहेत. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होतेय.
चारधाम यात्रेचा देखावा
चारधाम यात्रा म्हंटल की गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री अशी ही यात्रा करावी लागते. तस हे लांब असल्यामुळे अनेकांना ही यात्रा करणं शक्य होत नाही. पण या देखव्याच्या माध्यमातून भाविक भक्तांना ते पाहता येणार आहे. इथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणून ही या ठिकाणी लोक आपला नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात.
advertisement
1970 ला झाली मंडळाची स्थापना
थोर क्रांतिकारकाच्या नावाने या गणेश मंडळाची स्थापना 1970 झाली. सुरुवातीला 5 संस्थापकानी मिळून याची स्थापना केली. तसेच आपल्या संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी मंडळ सातत्याने नवीन काहीतरी करत असते. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा मंडळाशी याच कारणास्तव स्नेहबंध जुळला होता. यापूर्वी देवदास, जोधाअकबर असे कलात्मक एकाहून एक देखावे त्यांच्या नेतृत्वाखाली तयार केले जायचे, असे मंडळाचे पदाधिकारी सांगतात.
advertisement
अडीच महिन्यात साकारला देखावा
चारधाम यात्रचा देखावा तयार करण्यासाठी दोन ते अडीच महिने इतका कालावधी लागला. जवळ पास 40 कलाकारांच्या साह्याने देखाव्याची निर्मिती करण्यात आली. नयनरम्य देखावा पाहण्यात, नवस करण्यात, कृतज्ञतेने नवस फेडण्यात भक्तगण गुंग झालेले असतात. पुण्यात लाईट डेकोरेशन हे सर्व प्रथम बाबू गेनू मंडळाने आणले. नगाऱ्यावर जुगलबंदीसाठी अत्यंत फेमस होते. नवस केलेला पूर्ण झाला असं अनेक लोक येऊन सांगतात आणि लोकांनीच नवसाला पावणारा गणपती म्हणून नाव दिले आहे, अशी माहिती बाबू गेनू मंडळाचे पदाधिकारी दुर्गेश नवले यांनी सांगितलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 24, 2023 9:43 AM IST