विसावा मारुती हे नाव कसं पडलं? तुम्हाला माहिती आहे का इतिहास? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुण्यात सर्वात जास्त मंदिरं ही मारुतीची आहेत. त्यापैकीच पुण्यातील एक वेगळं नाव असणारं विसावा मारुती मंदिर आहे.
पुणे, 22 सप्टेंबर : पुण्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुण्याची ओळख आहे. पुण्यात आपल्याला वेगवगेळी मंदिरे पाहिला मिळतात. या मंदिराची नावेही जरा इतरांपेक्षा जरा हटके आहेत. पुण्यात सर्वात जास्त देवळे ही मारुतीची आहेत. पेठा-पेठांत असलेल्या मारुतींना दिलेली गमतीशीर नावे अनेकदा टिंगलवजाही वाटतात. त्यांची ओळख करून घेताना, त्यांची नावे समजून घेताना मोठी मौज वाटते. पण पूर्वीच्याकाळी बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना पत्ते ओळखण्यासाठी या मंदिरांचा खूप उपयोग व्हायचा, आता मात्र आज या मंदिरांची ओळख पुसू लागली आहे. त्यापैकीच पुण्यातील एक वेगळं नाव असणार विसावा मारुती मंदिर आहे.
काय आहे मंदिराचा इतिहास ?
विसावा मारुती मंदिराचा इतिहास 18 व्या शतकाच्या सुरुवातीचा आहे. असे मानले जाते की विसावा नावाच्या एका भक्ताने मंदिराची स्थापना केली होती, जो पुण्याचा रहिवासी होता. विसावा यांची भगवान हनुमानावर नितांत भक्ती होती आणि त्यांना त्यांच्या सन्मानार्थ मंदिर बांधायचे होते. त्यामुळे त्याने पुण्यातील सदाशिव पेठेतील एका चौकाची निवड केली त्याला आज विसावा मारुती चौक म्हणून ओळखले जाते, अशी माहिती इतिहास अभ्यासक संजय सोनवणे यांनी दिली.
advertisement
कसं पडलं नाव ?
आज एकविसाव्या शतकातही माणसाला एकही क्षण विसावा नाही. पण हा मारुती मात्र इथे वर्षानुवर्ष विसावा घेत आहे अन् विसावा मारुती नावाने पुण्यातल्या सदाशिव पेठेत अनेकांसाठी पत्ता शोधण्यासाठी सहाय्य करत आहे. फक्त खाणा-खुणा म्हणून या देवांची ओळख नसून हे पुण्याचं वैभव आहे. पुण्यातील देवतांची नाव पाहिली की असं वाटतं हे देवांची सुद्धा टिंगल करतात. पण ते तस नाही त्याच्या मागे काही तरी आख्यायिका आहे.
advertisement
Ganesh Chaturthi : ..म्हणून मोरगावच्या मयुरेश्वरासमोर आहे नंदीची मूर्ती; काय आहे आख्यायिका?
पुण्यामध्ये उंबऱ्या मारुती, नवश्या मारुती, पासोड्या मारुती आहे. पूर्वी स्मशानभूमीकडे येतान खांदेकरी करी थकायचे. आणि मारुतीच्या मंदिरासमोर विसावा घ्यायचा असा एक क्रम चालू केला. मग हळूहळू हे असंच पुढे सुरु झालं आणि त्याच नाव पडलं विसावा मारुती. असं ही म्हंटल जात की पुण्यात अनेक मारुती आहेत आणि हा विसवा मारुती म्हणून याच नाव विसावा मारुती, अशीही माहिती संजय सोनवणे यांनी दिली आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 23, 2023 8:09 AM IST