Ganesh Chaturthi : ..म्हणून मोरगावच्या मयुरेश्वरासमोर आहे नंदीची मूर्ती; काय आहे आख्यायिका?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो.
पुणे, 19 सप्टेंबर, जितेंद्र जाधव : मयुरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. मयुरेश्वराचं मंदिर हे सुभेदार गोळे यांनी बांधलं आहे. आदिलशाही कालखंडात याचं बांधकाम करण्यात आलं. सुभेदार गोळे हे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा होते.
पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे येथील गणपतीला मयुरेश्वर असं नाव पडलं. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे गावाला मोरगाव असे म्हणतात.
या मंदिरात मयुरेश्वराबरोबरच रिद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.
advertisement
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.
पुणे रेल्वे स्टेशन पासून मोरगाव हे हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६४ कि.मी. वर आहे.
advertisement
पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि.मी. आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
September 19, 2023 8:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ganesh Chaturthi : ..म्हणून मोरगावच्या मयुरेश्वरासमोर आहे नंदीची मूर्ती; काय आहे आख्यायिका?