Bigg Boss Marathi 6: आधी रितेश भाऊंसमोर मारलं, नंतर त्याच्याच गळ्यात पडून ढसाढसा रडली; तन्वीकडून आयुषसोबत मैत्री की प्रेमाची कबुली?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
घरामध्ये ज्यांच्या मैत्रीच्या चर्चा रंगायच्या, त्याच तन्वी आणि आयुषमध्ये आता ठिणगी पडलेली आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
रविवारी पार पडलेल्या 'भाऊचा धक्का'वर बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचा एकमेंकावर चांगलाच पारा चढलेला पाहायला मिळाला. प्रत्येक स्पर्धकाने फक्त टास्कपुरती नाही तर, सामान्य वेळी सुद्धा एकमेकांवर आवाज वाढवत आपला राग व्यक्त केला. 'भाऊच्या धक्का'वर रितेश भाऊंनी पंच बॅगवर स्पर्धकांना ज्या आपल्या प्रतिस्पर्धी स्पर्धकाचा जास्त त्रास होतोय, त्याचा फोटो त्या बॅगवर लावून आपला राग व्यक्त करायचा होता. या टास्कमध्ये आयुष आणि तन्वीतील वाद विशेष चर्चेचा विषय ठरला. 'भाऊच्या धक्का'वर तन्वीकडून आयुषसोबत मैत्री की प्रेमाची कबुली? अशी चर्चा होताना दिसत आहे.
घरामध्ये ज्यांच्या मैत्रीच्या चर्चा रंगायच्या, त्याच तन्वी आणि आयुषमध्ये आता ठिणगी पडलेली आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तन्वीने चक्क रितेश देशमुख समोरच आयुषला मारलं आहे. जेव्हा तन्वीची वेळ आली, तेव्हा तिने कोणा शत्रूचा नाही तर आपला जवळचा मित्र म्हणवणाऱ्या आयुषचा फोटो लावला. तन्वी संतापून म्हणाली, "मी याला हजारवेळा सांगितलंय की मी तुझ्यामध्ये माझा बेस्ट फ्रेंड शोधतेय, पण याला काहीच कळत नाहीये." त्यावर आयुषनेही तितक्याच रोखठोकपणे उत्तर दिलं की, "मी तुला आधीच स्पष्ट केलंय की मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही."
advertisement
आयुषचं हे वाक्य ऐकताच तन्वीचा संयम सुटला. तिने पंचिंग बॅग बाजूला सारली आणि थेट समोर बसलेल्या आयुषला मारलं. हा प्रकार पाहून स्वतः रितेश भाऊ आणि घरातील इतर सदस्यही अवाक झाले. तन्वीचं हे वागणं पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. अनेकांना असं वाटतंय की हे केवळ मैत्रीचं भांडण नाही. काही प्रेक्षक मात्र तन्वीवर नाराज आहेत. सोबतच 'भाऊच्या धक्का'वर तन्वीकडून आयुषसोबत मैत्री की प्रेमाची कबुली? अशी चर्चा होताना दिसत आहे. 'भाऊच्या धक्का' नंतर तन्वी आयुषच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडली आहे. तिने आपल्या अश्रुंना वाट फोडली.
advertisement
तन्वीने मनामध्ये असलेल्या सर्व गोष्टींना 'भाऊच्या धक्का'च्या एपिसोडच्या शेवटी वाट मोकळी केली आहे. आयुष, तन्वीला म्हणतो की, "जितक्या आत्मियतेने तु आपल्या फ्रेंडशिपकडे पाहत होती, तितक्या आत्मियततेने मी आपल्या फ्रेंडशिपकडे पाहत नव्हतो. त्यासाठी मी तुला दोनवेळा सॉरी बोलेल. पहिलं म्हणजे, मी तुझं इन्टेन्शन ओळखू शकलो नाही आणि तु कोणत्या मुद्द्यावर दुखवतेस ते मला माहिती नव्हतं. माझ्यासोबत फ्रेंडशिपमध्ये खूप जणं आहेत. ते माझ्यासोबत खूप चांगले बोलतात वैगेरे. त्यामुळे मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 10:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6: आधी रितेश भाऊंसमोर मारलं, नंतर त्याच्याच गळ्यात पडून ढसाढसा रडली; तन्वीकडून आयुषसोबत मैत्री की प्रेमाची कबुली?






