मुंबईकरांचं श्रद्धास्थान नाथस्वामी बेकरी मठ, अय्यंगार बेकरीशी काय कनेक्शन? पाहा आख्यायिका
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Nathswami Bakery Math: मुंबईतील नाथ स्वामी बेकरी मंठ हे स्वामी भक्तांचं श्रद्धास्थान आहे. बेकरी मठाची आख्यायिका जाणून घेऊ.
मुंबई : लोअर परळ स्टेशन आणि करी रोड स्टेशन पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर असलेला नाथ स्वामी बेकरी मठ होय. या मठाला नाथस्वामी बेकरी मठ नाव कसं पडलं असेल? किंवा या मठाला बेकरी मठ का म्हणतात? असा प्रश्न बहुतेकांना पडतो. सोमवारी म्हणजेच 31 मार्चला स्वामी समर्थ प्रगट दिन आहे. याचनिमित्ताने आपण नाथ स्वामी बेकरी मठाची आख्यायिका जाणून घेणार आहोत. तन्वी कदम यांनी लोकल18 सोबत बोलताना याबाबत माहिती दिलीये.
‘बेकरी मठ’ नावामागील कथा
बहुतेक लोकांना प्रश्न पडतो की, मठाला 'बेकरी मठ' हे नाव का दिलं गेलं? यामागे नाथस्वामींच्या आध्यात्मिक प्रवासाची एक खास कहाणी आहे. साल 2010 मध्ये, नाथस्वामींनी अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकमधील बेंगलोर अय्यंगार बेकरी त्यांनी विकत घेतली आणि आपल्या मुलाच्या नावावर चैतन्य बेंगलोर अय्यंगार बेकरी सुरू केली. मात्र, स्वामींच्या मनात मात्र आध्यात्मिक सेवेत अधिक ओढ होती. त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येणाऱ्या लोकांना मदत करत असताना बेकरी श्रद्धास्थान बनू लागली.
advertisement
तसबिरीची अलौकिकता
नाथस्वामींनी बेकरीत लावलेली स्वामी समर्थांची तसबीर भक्तांना चमत्कारिक अनुभव देऊ लागली. लोकांची श्रद्धा दृढ झाली आणि बेकरी मठामध्ये रूपांतरित झाली. ज्या दुकानाच्या गाळ्यात ही बेकरी होती. ती जागा भाड्यावर घेतली होती. बेकरी चालू असतानाच जागा मालकाने भाडे करार न वाढवता मठ रिकामा करण्याची मागणी केली. स्वामींनी सर्व प्रयत्न करूनही जागा टिकवता आली नाही. मात्र, त्यांनी हा प्रसंगही स्वामी समर्थांच्या कृपेशी जोडला.
advertisement
स्वामींच्या मार्गदर्शनाखाली ‘मठ तुमच्या द्वारी’ ही संकल्पना राबवण्यात आली. भक्तपरिवार विखरू नये यासाठी नाथस्वामींनी प्रत्येक भक्ताला एकमेकांशी जोडून ठेवलं. अकरा समागम पूर्ण होत नाहीत तोवर नाथस्वामींच्या कृपेने मठासाठी योग्य जागा मिळाली. यामध्ये स्वामींच्या पत्नी ममता सतिश करलकर यांनी मोठा त्याग केला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यभराचे बचत नाथस्वामींच्या कार्यासाठी अर्पण केली, असे तन्वी कदम यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 30, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
मुंबईकरांचं श्रद्धास्थान नाथस्वामी बेकरी मठ, अय्यंगार बेकरीशी काय कनेक्शन? पाहा आख्यायिका