स्वप्नात मिळालेल्या दृष्टांतानंतर बांधले सिंहगडाजवळ मंदिर, पाहा काय आहे अख्यायिका

Last Updated:

सिंहगडाच्या पायथ्याला डावजे येथे एक शिवमंदिर आहे. या ठिकाणी असणाऱ्या विश्वस्तांमुळे लाखो लोकांची दारू सुटलीय.

+
स्वप्नात

स्वप्नात मिळालेल्या दृष्टानंतर बांधले सिंहगडाजवळ मंदिर, पाहा काय आहे अख्यायिका

पुणे, 6 सप्टेंबर: सध्या श्रावण महिना सुरू असून या महिन्याला हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे. व्रत वैकल्यांचा महिना मानला जाणाऱ्या या महिन्यात मोठ्या प्रमाणात शिवपूजा होत असते. त्यासाठी देशभरातील शिवमंदिरं भक्तांनी गजबजलेली दिसतात. पुणे येथील सिंहगड परिसरात असंच एक नीलकंठेश्वर शिवमंदिर असून ते पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकांची वर्दळ असते. या मंदिरासोबत काही आख्यायिका जोडल्या असून त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे.
कुठं आहे हे शिवमंदिर?
पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेली ही मंदिरे अनेकांना माहिती नसतात. असेच एक मंदिर सिंहगड जवळील डावजे गावात आहे. स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. 1962 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली. हे मंदिर डोंगरात असल्याने जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतर चालत वर जावे लागते. तरीही भाविकांची वर्दळ या ठिकाणी असते.
advertisement
मंदिर निर्मितीची आख्यायिका
वनसंरक्षक व शिवभक्त शंकरराव सर्जे ऊर्फ सर्जेमामा हे निळकंठेश्वर मंदिराचे मुख्य विश्वस्त होते असं सांगितलं जातं. 1962 साली निळकंठेश्वराच्या डोंगरावर असलेल्या वनात वनरक्षक म्हणून ते काम करीत होते. एके दिवशी स्वतः भगवान शिवशंकरांनी त्यांना स्वप्नात येऊन मी व माझा नंदी सदर डोंगरावर एका विशिष्ट ठिकाणी जमिनीखाली गाडलो गेलो आहे. मला बाहेर काढ, असा दृष्टांत दिला. त्यानंतर सर्जेमामांनी त्वरीत सांगितलेल्या ठिकाणी खणून पाहिले असता त्यांना तेथे नंदी तसेच भगवान शिवशंकरांचे लिंग आढळले. त्यांनी त्याला बाहेर काढून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. त्यामुळे याला स्वयंभू नीलकंठेश्वर म्हंटल जात, असं सेवेकरी दिनकर शिंदे यांनी सांगितलं.
advertisement
अनेक लोकांना केलं व्यसनमुक्त
सर्जमामांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यांनी येथे दारु व्यसनमुक्ती अभियान सुरू केले. यातून सुमारे 2 लाख 56 हजार लोकांना दारुच्या व्यसनातून मुक्त केले, अशी माहिती मंदिराचे सेवेकरी शिंदे यांनी दिली.
advertisement
निसर्गरम्य मंदिर परिसर
नीलकंठेश्वर मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे मंदिर डोंगरात असल्यामुळे लोकांना 2 ते 3 किमी डोंगर चडून जावं लागत. पण या मंदिराचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे. या डोंगरावरून पानशेत, खडकवासला धरण देखील पाहिला मिळतं. हे मंदिर सिहंगड रोडला असलेल्या डावजे या गावामध्ये आहे. तसेच इथले पुतळे हे मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे या मंदिराला अवश्य भेट देऊ शकता.
मराठी बातम्या/Temples/
स्वप्नात मिळालेल्या दृष्टांतानंतर बांधले सिंहगडाजवळ मंदिर, पाहा काय आहे अख्यायिका
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement