श्री विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी मोठा प्रतिसाद, एकाच दिवसात 31 मार्चपर्यंत ऑनलाईन नोंदणी फुल्ल!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vitthal Pooja: पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणी नित्यपूजेसाठी ऑनलाईन बूकिंग सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
पंढरपूर: पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या नित्यपूजेसाठी नुकतेच ऑनलाईन नोंदणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून 31 मार्च 2025 पर्यंतची नोंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या ‘ऑनलाईन’ नोंदणीला महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील भाविकांनी देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. याबाबत माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलीये.
पंढरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी हे लाखो भाविकांचं आराध्य दैवत आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्व पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपबल्ध करून दिल्या जातात. या पूजेसाठी अगोदर नोंदणी करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. भाविकांची वेळ आणि श्रम यामध्ये बचत व्हावी म्हणून मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
एकाच दिवसात मोठा प्रतिसाद
श्री विठ्ठल-रुक्मिणी नित्यपूजेसाठी 26 डिसेंबर रोजी नोंदणी सुरू झाली. त्यानंतर पहिल्याच दिवशी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 31 मार्च 2025 पर्यंत नोंदणी पूर्ण झाली आहे. या योजनेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. श्रींच्या नित्यपूजा, तुळशी पूजा व पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले. यामधून मंदिर समितीला आतापर्यंत 41 लाख 93 हजार इतके देणगी मूल्य मिळाले आहे.
advertisement
दरम्यान, श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरातील दुसऱ्या टप्प्यातील नित्यपूजा, पाद्यपूजा आणि तुळशी पूजा यांची नोंदणी बाकी आहे. श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीच्या https://www.vitthalrukminimandir.org/ या अधिकृत संकेतस्थळावरून ही ऑनलाईन नोंदणी केली जात आहे.
view commentsLocation :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Dec 28, 2024 1:10 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
श्री विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी मोठा प्रतिसाद, एकाच दिवसात 31 मार्चपर्यंत ऑनलाईन नोंदणी फुल्ल!











