ऐतिहासिक हनुमान मंदिरात रोज वाढते मूर्ती, महाराष्ट्रात कुठे आहे हे ठिकाण?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मारुती मंदिराला अंदाजे 70 ते 75 वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. या देवस्थानाची विशेषतः म्हणजे मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही दिवसेंदिवस वाढत असून मूर्तीवर नैसर्गिक रित्या काही बाण दिसून येतात.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील वर्धा-आर्वी मार्गावर असलेल्या सेवा येथील महारुद्र हनुमान देवस्थानाची ख्याती सर्व दूर पसरलेली दिसून येते. सेवा येथील मारुती मंदिराला अंदाजे 70 ते 75 वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. या देवस्थानाची विशेषतः म्हणजे मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही दिवसेंदिवस वाढत असून मूर्तीवर नैसर्गिक रित्या काही बाण दिसून येतात आणि या बाणांची वाढ होत असल्याचं सांगितलं जातं. मंदिरात नतमस्तक होऊन हनुमान चरणी प्रार्थना केल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात,अशी भाविकांची श्रद्धा आहे.
advertisement
50 वर्षांपूर्वी होती 2 फुटांची मूर्ती
अंदाजे 50 वर्षांच्या आधी सेवा येथील शेती परिसरात एक अगदी साधं छोटंसं मंदिर होतं. मंदिरात त्याकाळी हीच मूर्ती 2 ते अडीच फूट इतकीच होती. तेव्हा याठिकाणी मूर्तीवर 2-3 बाण होते मात्र आता मूर्तीची उंची सहा ते सात फूट असून मूर्तीवर 11 बाण दिसून येत आहे, अशी माहिती मंदिराचे सचिव संजय सराफ यांनी दिली.
advertisement
तिसऱ्यांदा झालं बांधकाम
आम्ही कॉलेजमध्ये असताना सगळे मित्र मंदिरात जायचो तेव्हा हे मंदिर आम्हाला दिसलं. तेव्हापासून आम्हाला सतत तिथे जावंस वाटत होतं. म्हणून नेहमी जायचो दर्शन घ्यायचो. त्याकाळी मंदिरात जायला रस्ताही नव्हता. मात्र आता कालांतराने परमेश्वराच्या कृपेने हळूहळू सगळं वाढत गेलं आहे. पूर्वी मंदिर लहान बांधले होते आणि आताचं हे मंदिर आणि गाभारा तिसऱ्यांदा बांधले गेले आहे. कारण मूर्ती वाढत जाईल ह्याचा अंदाज नव्हता आणि आता बांधलेलं मंदिर हे पुढच्या 100 वर्षांच्या अंदाजाने बांधले आहे. मंदिराचा कळस देखील तिसरा कळस आहे. मंदिरात येणारे भाविकांची देणगी, लोकसहभाग तसेच आमदार, खासदार यांच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याठिकाणी विकास कामे केली जात असून पर्यटन स्थळ क दर्जा प्राप्त झाला असल्याचं मंदिराचे कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत मिटकरी यांनी सांगितलं.
advertisement
भक्त चांदीचे डोळे करतात दान
मंदिरात आतील भाग अतिशय मन प्रसन्न करणारा आहे. याठिकाणी शिव पंचायत आणि प्रभू श्री रामाचं मंदिर ही आहे. आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी भक्त भव्य महाप्रसाद आयोजित करतात. आणि पाणग्यांचा नैवेद्य दाखवतात. तसेच अनेक भक्त याठिकाणी मूर्तीला चांदीचे डोळेही दान करतात. सण उत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.
advertisement
देवाला नैवेद्य अर्पण करताना ही चूक अजिबात करू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान
मंदिर परिसर अतिशय रम्य आहे. मंदिराच्या आवारात जुनी विहीर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वयंपाक करण्यासाठी भांडी, पूजेच्या साहित्याची दुकाने तसेच मुलांना खेळण्यासाठी खेळणी आणि छोटे गार्डन देखील आहे. लोकसहभाग, देणगी आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून येथील विकासकामे केली जात आहेत. हनुमान जयंती, राम नवमी यासारखे सण उत्सव मोठ्या उत्साहात याठिकाणी साजरे होतात. आणि मोठ्या संख्येने भाविक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. अशाप्रकारे सेवा येथील महारुद्र हनुमान मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
February 19, 2024 11:12 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
ऐतिहासिक हनुमान मंदिरात रोज वाढते मूर्ती, महाराष्ट्रात कुठे आहे हे ठिकाण?

