advertisement

Australia vs Zimbabwe : नाव मोठं लक्षण खोटं! झिम्बॉब्वेने केला कांगारूंचा टप्प्यात कार्यक्रम, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा पहिला उलटफेर?

Last Updated:

Australia vs Zimbabwe : झिम्बॉब्वेने फक्त 2 विकेट गमावून तब्बल 169 केल्या होत्या. त्याला प्रत्युतर देताना आता ऑस्ट्रेलियाचा डाव गडबडल्याचं पहायला मिळालं.

Australia top Order Collapsed Against Zimbabwe
Australia top Order Collapsed Against Zimbabwe
Australia vs Zimbabwe T20 WC : यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अनेक ट्विस्ट पहायला मिळत आहेत. अशातच आता कोलंबोमध्ये सुरू असलेल्या झिम्बॉब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात देखील मजेशीर ट्विस्ट पहायला मिळाला. झिम्बॉब्वेने फक्त 2 विकेट गमावून तब्बल 169 केल्या होत्या. त्याला प्रत्युतर देताना आता ऑस्ट्रेलियाचा डाव गडबडल्याचं पहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर ढेपाळल्याने त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.

170 रन्सचे टार्गेट

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये झिम्बाब्वेने तगड्या ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 170 रन्सचे आव्हानात्मक टार्गेट ठेवलं आहे. या मॅचमध्ये झिम्बाब्वेच्या बॅटर्सनी संयमी पण प्रभावी बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सना चांगलेच झुंजवले. झिम्बाब्वेने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये केवळ 2 विकेट्स गमावून 169 रन्सचा समाधानकारक स्कोअर बोर्डवर लावला आहे. अशातच ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर ढेपाळली होती.
advertisement
advertisement

मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉवर ऑस्ट्रेलियाची जबाबदारी

शेवटचं वृत्त समोर आलं त्यावेळी, 29-4 अशी परिस्थिती ऑस्ट्रेलियाची झाली आहे. जॉश इंग्लीश, ट्रेव्हिस हेड, कॅमरून ग्रीन आणि टीम डेव्हिड यांच्यासारखी मोठी नाव देखील खास कामगिरी करू शकली नाहीत. कॅमरून ग्रीन आणि टीम डेव्हिड यांना तर भोपळा देखील फोडता आला नाही. त्यानंतर आता मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांच्या खांद्यावर ऑस्ट्रेलियाची जबाबदारी आहे.
advertisement

ऑस्ट्रेलिया इतिहास रचणार का?

दरम्यान, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध आत्तापर्यंत कधीच विजय मिळवता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आता इतिहास रचणार का? असा सवाल विचारला जात आहे.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, मार्कस स्टॉइनिस, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, मॅथ्यू कुहनेमन.
advertisement
झिम्बॉब्वेची प्लेईंग इलेव्हन - ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), डीओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसाकादझा, ग्रॅमी क्रेमर, ब्लेसिंग मुझाराबानी.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Australia vs Zimbabwe : नाव मोठं लक्षण खोटं! झिम्बॉब्वेने केला कांगारूंचा टप्प्यात कार्यक्रम, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा पहिला उलटफेर?
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement