IPL 2026 : प्रॅक्टिसमधून 2 दिवस गायब, मुंबईच्या टीममधूनही बाहेर, हार्दिक पांड्याला अचानक काय झालं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सने केकेआरविरुद्ध विजय मिळवत धमाकेदार सुरूवात केली, पण मोसमाच्या दुसऱ्याच सामन्याआधी मुंबईला मोठा धक्का बसला आहे.
नवी दिल्ली : आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सने केकेआरविरुद्ध विजय मिळवत धमाकेदार सुरूवात केली, पण मोसमाच्या दुसऱ्याच सामन्याआधी मुंबईला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या खेळत नाहीये. हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईचं नेतृत्व करत आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात टॉसवेळी सूर्यकुमार यादवला हार्दिक पांड्याला नेमकं काय झालं आहे? याबद्दल विचारण्यात आलं, पण सूर्याने हार्दिकच्या दुखापतीबद्दल स्पष्टपणे काहीच सांगितलं नाही, त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
'हार्दिक पांड्याला बरं नाहीये, जे चांगलं वाटत नाहीये. आजच्या सामन्यासाठी तो फिट नाहीये, त्यामुळे त्याच्याऐवजी मी कॅप्टन्सी करत आहे', असं वक्तव्य सूर्यकुमार यादवने केलं आहे. मागच्या दोन दिवसांपासून हार्दिक पांड्या हा नेट प्रॅक्टिससाठीही आला नसल्याची माहिती समोर येत आहे. हार्दिकची दुखापत फार गंभीर नसेल, अशी प्रार्थना मुंबई इंडियन्सची टीम आणि चाहते करत आहेत.
advertisement
हार्दिकमुळे टीममध्ये बदल
हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत मुंबई इंडियन्सना टीममध्ये 3 बदल करावे लागले आहेत. अल्लाह गझनफरऐवजी मिचेल सॅन्टनर टीममध्ये आला आहे. केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी सॅन्टनर उपलब्ध नव्हता. तर हार्दिक पांड्या टीममध्ये नसल्यामुळे मुंबईला त्यांची बॅटिंग आणखी मजबूत करावी लागली आहे, त्यामुळे ट्रेन्ट बोल्टऐवजी कॉर्बिन बॉश याला संधी मिळाली आहे, तर हार्दिकऐवजी दीपक चहर खेळत आहे. सॅन्टनर आणि बॉर्श टीममध्ये आल्यामुळे मुंबईची बॅटिंग आठव्या क्रमांकापर्यंत आहे, तर नवव्या क्रमांकावर येणारा शार्दुल आणि दहाव्या क्रमांकावर येणारा दीपक चहरही बॅटिंग करू शकतात.
advertisement
अक्षर पटेलने टॉस जिंकला
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या खेळपट्टीवर पहिलीच मॅच आहे तसंच लखनऊविरुद्धचा पहिला सामना आम्ही पहिले बॉलिंग करूनच जिंकला आहे, असं अक्षर पटेल म्हणाला आहे.
मुंबईची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, रियान रिकलटन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शरफेन रदरफोर्ड, मिचेल सॅन्टनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
advertisement
दिल्लीची प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 3:47 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : प्रॅक्टिसमधून 2 दिवस गायब, मुंबईच्या टीममधूनही बाहेर, हार्दिक पांड्याला अचानक काय झालं?









