advertisement

IPL 2026 : बाप बाप होता है! 35 वर्षांच्या शमीचा सापळा, अभिषेक अलगद अडकला, पंत पाहतच राहिला!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये लखनऊविरुद्धच्या सामन्यात हैदराबादला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले आहेत. या सामन्यात लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.

बाप बाप होता है! 35 वर्षांच्या शमीचा सापळा, अभिषेक अलगद अडकला, पंत पाहतच राहिला!
बाप बाप होता है! 35 वर्षांच्या शमीचा सापळा, अभिषेक अलगद अडकला, पंत पाहतच राहिला!
हैदराबाद : आयपीएल 2026 मध्ये लखनऊविरुद्धच्या सामन्यात हैदराबादला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले आहेत. या सामन्यात लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलला मोहम्मद शमीने अभिषेक शर्माला अलगद सापळ्यात अडकवला. यानंतर मोहम्मद शमीने त्याच्या पुढच्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलला ट्रेव्हिस हेडचीही विकेट घेतली. शमीने पहिल्या 2 विकेट घेतल्यानंतर प्रिन्स यादवने इशान किशनला बोल्ड केलं.
पहिल्या 5 ओव्हरमध्ये हैदराबादने फक्त 15 रन करून 3 विकेट गमावल्या. यात मोहम्मद शमीने त्याच्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 9 रन देऊन 2 विकेट मिळवल्या.

मोहम्मद शमीचा सापळा

अभिषेक शर्माची विकेट घेण्यासाठी मोहम्मद शमीने सापळा रचला. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलआधी शमीने स्लिपमध्ये असलेल्या मणीमरन सिद्धार्थला शॉर्ट थर्ड मॅनला पाठवण्यात आलं, त्यानंतर मोहम्मद शमीने 114 किमी प्रती तासाच्या वेगाने स्लो बॉल टाकला. स्लिपचा फिल्डर शॉर्ट थर्ड मॅनला लावल्यानंतर पुढच्याच बॉलला अभिषेक शर्माने त्याच्याच हातात कॅच दिला.
advertisement
शेवटच्या बॉलवर अभिषेकची विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने त्याच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला ट्रेव्हिस हेडलाही स्लो बॉल टाकूनच माघारी धाडलं. शमीने स्लो बॉल टाकल्यामुळे हेडचा शॉट चुकला आणि मिड ऑफला उभ्या असलेल्या एडन मार्करमने त्याचा कॅच पकडला. लागोपाठ दोन बॉलला दोन विकेट घेतल्यानंतर शमी हॅट्रिकवर होता, पण त्याला हॅट्रिक घेण्यात यश आलं नाही.
advertisement

35 वर्षांच्या शमीचा कमबॅकसाठी प्रयत्न

35 वर्षांचा मोहम्मद शमी टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी जोरदार मेहनत करत आहे. रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी-20, विजय हजारे ट्रॉफीमध्ये शमीने धमाकेदार कामगिरी केली, यानंतर आता आयपीएलमध्येही शमीचे बॉल आग ओकत आहेत. यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच बॉलवर शमीने केएल राहुलचीही विकेट घेतली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : बाप बाप होता है! 35 वर्षांच्या शमीचा सापळा, अभिषेक अलगद अडकला, पंत पाहतच राहिला!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement