Mumbai Crime Branch : आशिया कप जिंकवणाऱ्या खेळाडूला 'डी कंपनी'कडून धमकीचा मेसेज, अंडरवर्ल्डने मागितली 5 कोटींची खंडणी!

Last Updated:

Extortion Threat to Rinku Singh : राष्ट्रवादी NCP काँग्रेसचे नेते दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचे चिरंजीव जीशान सिद्दीकी यांना 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी मिळाली होती.

Extortion Threat to Rinku Singh
Extortion Threat to Rinku Singh
Mumbai Crime Branch : भारतीय क्रिकेट टीमचा उदयोन्मुख खेळाडू रिंकू सिंह याला (Rinku Singh) अंडर वर्ल्डकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी मिळाली असल्याची माहिती मुंबई क्राइम ब्रांचने (Crime Branch) उघड केली आहे. ही धमकी इतर कोणी नव्हे, तर फरार गुंड दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी' (D Company) या टोळीकडून देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते एप्रिल 2025 या कालावधीत रिंकू सिंहला धमकी देण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे.

तीन वेगवेगळ्या धमक्यांचे मेसेज

रिंकू सिंहच्या प्रमोशनल टीमला तीन वेगवेगळ्या धमक्यांचे मेसेज पाठवण्यात आले होते. हे धमकीचे मेसेज थेट रिंकू सिंहला न पाठवता, त्याच्या प्रमोशनल टीमला पाठवण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणात अधिकची चौकशी सुरू केली आहे.

जीशान सिद्दीकींना 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकी

क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण एका मोठ्या रॅकेटशी (racket) जोडलेले आहे. कारण याच प्रकारच्या धमक्या जीशान सिद्दीकी यांनाही मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी NCP काँग्रेसचे नेते दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचे चिरंजीव जीशान सिद्दीकी यांना 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी मिळाली होती.
advertisement
advertisement

खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम...

दरम्यान, या प्रकरणात इंटरपोलच्या मदतीने त्रिनिदाद आणि टोबॅगोमधून मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवीद या आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. जीशान यांना 19 ते 21 एप्रिल दरम्यान हे धमकीचे ई-मेल (e-mail) मिळाले होते, ज्यात खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी स्पष्ट चेतावनी देण्यात आली होती. या दोन वेगवेगळ्या प्रकरणांत एकच टोळी गुंतलेली असल्याचा संशय क्राइम ब्राँचला आहे, ज्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढलं आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Crime Branch : आशिया कप जिंकवणाऱ्या खेळाडूला 'डी कंपनी'कडून धमकीचा मेसेज, अंडरवर्ल्डने मागितली 5 कोटींची खंडणी!
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement