advertisement

'पाकिस्तानात आलात तर ठार मारू...', दोन दिग्गज खेळाडूंना उघड धमकी, PSL सुरू होण्याआधीच पॅकअप?

Last Updated:

पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 चा मोसम सुरू होण्याआधीच स्पर्धेवर सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. पीएसएल सुरू व्हायच्या आधी दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंना उघड धमकी देण्यात आली आहे.

'पाकिस्तानात आलात तर ठार मारू...', दोन दिग्गज खेळाडूंना उघड धमकी, PSL सुरू होण्याआधीच पॅकअप?
'पाकिस्तानात आलात तर ठार मारू...', दोन दिग्गज खेळाडूंना उघड धमकी, PSL सुरू होण्याआधीच पॅकअप?
मुंबई : पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 चा मोसम सुरू होण्याआधीच स्पर्धेवर सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील सक्रीय दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) चा गट जमात-उल-अहरारने परदेशी खेळाडूंना धमकी दिली आहे. तुमच्या देशाच्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये पाठवू नका, असा थेट इशारा या संघटनेने दिला आहे. खेळाडूंसोबत काही अनुचित घटना घडली तर त्याची जबाबदारी आमची असणार नाही, अशी धमकी संघटनेच्या एका वरिष्ठ कमांडरने दिली आहे.
कमांडरच्या नावाने ही धमकी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, पण अजूनही याची पुष्टी करण्यात आलेली नाही. पीएसएलच्या मॅच होऊ नयेत आणि खेळाडू मैदानात उतरू नयेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही हा कमांडो व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.

दिग्गज खेळाडूंना धमकी

धमकी मिळालेली असतानाही ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यासारखी मोठी नावं पीएसएल 2026 मध्ये खेळणार आहेत. डेव्हिड वॉर्नर हा कराची किंग्सचा कर्णधार आहे तर स्मिथ मुलतान सुलतान्सकडून पदार्पण करणार असून तो पाकिस्तानमध्ये पोहोचला आहे.
advertisement
याशिवाय मार्नस लाबुशेन, मोईन अली, डेवॉन कॉनवे आणि एडम झम्पा यांच्यासारखे परदेशी खेळाडूदेखील या लीगचा भाग आहेत, त्यामुळे स्पर्धेच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. दहशतवादी संघटनेने वॉर्नर आणि स्मिथ सारख्या दिग्गज खेळाडूंचं नाव घेऊन धमकी दिली आहे, इकडे येऊन खेळलात तर परिणाम वाईट होतील, असा इशाराच या परदेशी खेळाडूंना देण्यात आला आहे.
advertisement

प्रेक्षकांशिवाय होणार सामने

पाकिस्तानमधली परिस्थिती बघता पीसीबीने काही पावलं उचलली आहे. पीएसएलचे सामने प्रेक्षकांशिवाय होणार आहेत, तसंच लाहोर आणि कराची या दोन ठिकाणीच पीएसएल खेळवली जाईल.
पीएसएल 2026 ला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, ज्यात एकूण 44 मॅच होतील. सर्व सामने लाहोर आणि कराचीमध्ये होतील, तसंच ओपनिंग सेरेमनीही रद्द करण्यात आली आहे. आता या धमकीनंतर परदेशी खेळाडू पीएसएल खेळणार का नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'पाकिस्तानात आलात तर ठार मारू...', दोन दिग्गज खेळाडूंना उघड धमकी, PSL सुरू होण्याआधीच पॅकअप?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement