VIDEO : गोलंदाजी बघून संघात घेतलं, पण पठ्ठ्याचा फलंदाजीत राडा, टीम इंडियाचं दार पुन्हा ठोठोवलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ज्या खेळाडूची गोलंदाजी बघून त्याला संघात घेतलं होते, त्याच खेळाडूने आता वादळी खेळी केली आहे. या खेळाडूने 33 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या बळावर संघाने 600 च्या पार धावसंख्या नेली होती.
Ranji Trophy 2025-26 : क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल हे सांगता येत नाही.असचं काहीस आजच्या एका सामन्यात घडलं आहे. कारण ज्या खेळाडूची गोलंदाजी बघून त्याला संघात घेतलं होते, त्याच खेळाडूने आता वादळी खेळी केली आहे. या खेळाडूने 33 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या बळावर संघाने 600 च्या पार धावसंख्या नेली होती.
खरं तर रणजी ट्ऱॉफी स्पर्धेत आंध्रप्रदेश आणि बंगालमध्ये क्वार्टर फायनल सामना सूरू आहे. या क्वार्टर फायनल सामन्यातील पहिल्या डावात बंगालने 629 धावा केल्या होत्या. यामध्ये सुदीप घरामीचं एकट्याच 299 धावांचं योगदान होतं. त्यानंतर सुमंता गुप्ताने 81 धावांची तर शकीब हबीब गांधीने 95 धावांची खेळी केली होती.
MOHAMMED SHAMI SMASHED 53 (33) IN THE RANJI TROPHY QUARTERS. 🔥pic.twitter.com/UbOjC4wWsS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 9, 2026
advertisement
या खेळीसोबत बंगालकडून रणजी खेळणाऱ्या मोहम्मद शमीचीही बॅट तळपली होती. मोहम्मद शमीने 33 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 7 चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 160 होता. शमीच्या या खेळीच्या बळावर बंगालने पहिल्या डावात 629 धावा केल्या होत्या.
advertisement
आता आंध्रप्रदेशने चौथ्या दिवसअखेर 64 धावांवर तीन विकेट गमावले आहेत. याआधी पहिल्या डावाच आंध्र प्रदेशने 295 धावा केल्या होत्या. यावेळी मुकेश कुमारने 5, आकाशदिपने 4 तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 8:21 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : गोलंदाजी बघून संघात घेतलं, पण पठ्ठ्याचा फलंदाजीत राडा, टीम इंडियाचं दार पुन्हा ठोठोवलं









