advertisement

Ranji Trophy : 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा गेम झाला, केएल राहुल विजयाच्या आड आला, 182 बॉलमध्ये मॅच फिरवली

Last Updated:

देशांतर्गत क्रिकेटमध्ये 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईला मोठा झटका बसला आहे.कारण मुंबईच फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे.क्वार्टर फायनलमध्ये कर्नाटकने मुंबईचा 4 विकेट राखून धुव्वा उडवल्याने त्यांचं आव्हान संपूष्ठात आलं आहे

ranji trophy mumbai vs kolkatta
ranji trophy mumbai vs kolkatta
Ranji Trophy Mumbai vs Karnataka : देशांतर्गत क्रिकेटमध्ये 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईला मोठा झटका बसला आहे.कारण मुंबईच फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे.क्वार्टर फायनलमध्ये कर्नाटकने मुंबईचा 4 विकेट राखून धुव्वा उडवल्याने त्यांचं आव्हान संपूष्ठात आलं आहे आणि कर्नाटक सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. कर्नाटकच्या या विजयात केएल राहुलने 130 धावांचे शतकीय आणि स्मरण आरने 79 धावांची नाबाद खेळी केली होती.
क्वार्टर फायनल सामन्यातील दुसऱ्या डावात मुंबईने कर्नाटक समोर 325 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकची सूरूवात खराब झाली होती. कर्नाटककडून मयंक अग्रवाल आणि केएल राहुल मैदानात उतरला होता. पण मयंक अग्रवाल अवघ्या तीन धावांवर बाद झाला होता.त्याच्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार देवदत्त पड्डीकलने कर्नाटकचा डाव सावरला होता.पण पुढ जाऊन पड्डीकल 39 वर बाद झाला.त्याच्यानंतर करून नायर 13 वर बाद झाला.
advertisement
कर्नाटकचे एकाबाजूने विकेट पडत असताना केएल राहूलने दुसऱ्या बाजूने संघाचा डाव सावरून ठेवला होता. त्यानंतर राहुल 130 धावांची शतकीय खेळी करून बाद झाला. त्यानंतर स्मरण आरने नाबाद 83 धावांची आणि त्याच्यासोबत विद्याधर पाटीलने 31 धावांची नाबाद खेळी केली.
मुंबईकडून तुषार देशपांडे आणि तनुष कोटीयनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. पण मुंबईला कर्नाटकला ऑल आऊट करता न आल्याने मुंबईने हा सामना गमावला होता.त्यामुळे मुंबईच क्वार्टर फायनलमध्ये आव्हान संपूष्ठात आलं होतं.
advertisement
मुंबईच्या दुसरा डावाबद्दल बोलायचं झालं तर विकेट किपर आकाश आनंदने 70 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. त्याच्या जोडीला मुशीर खानने 49 धावा आणि तनुश कोटीयनने 48 धावांची खेळी केली, आणि तुषार देषपाडेने 47 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर मुंबईने दुसऱ्या डावात 377 धावा केल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा गेम झाला, केएल राहुल विजयाच्या आड आला, 182 बॉलमध्ये मॅच फिरवली
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement