advertisement

T20 World Cup : कॅचसाठी दोघं धावले, अंगावर पडले, तरी बॉल सोडला नाही... आफ्रिकेच्या थरारक फिल्डिंगचा Video

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माचा संघर्ष सुरूच आहे. ग्रुप स्टेजच्या 3 पैकी 3 सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा शून्य रनवर आऊट झाला होता. यानंतर सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेकने त्याच्या वर्ल्ड कप करिअरमधली पहिली रन काढली.

कॅचसाठी दोघं धावले, अंगावर पडले, तरी बॉल सोडला नाही... आफ्रिकेच्या थरारक फिल्डिंगचा Video
कॅचसाठी दोघं धावले, अंगावर पडले, तरी बॉल सोडला नाही... आफ्रिकेच्या थरारक फिल्डिंगचा Video
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माचा संघर्ष सुरूच आहे. ग्रुप स्टेजच्या 3 पैकी 3 सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा शून्य रनवर आऊट झाला होता. यानंतर सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेकने त्याच्या वर्ल्ड कप करिअरमधली पहिली रन काढली, पण त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. अभिषेक जेवढा वेळ मैदानात होता, तेवढा वेळ त्याला बॅटिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत होता.
शॉट लागत नसल्यामुळे अखेर अभिषेक शर्माने वैतागून मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मार्को यानसनच्या बॉलिंगवर अभिषेक शर्माने लेग साईडच्या दिशेने हवेत बॉल मारला, यानंतर कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज कॅच पकडण्यासाठी धावले. बॉल पकडताना बॉश आणि महाराज यांच्यात टक्करही झाली आणि महाराज बॉशच्या अंगावर जाऊन पडला, पण तरीही बॉशने हातातून बॉल सोडला नाही.
advertisement
अभिषेक शर्मा 12 बॉलमध्ये 2 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 15 रन करून आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 188 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात अत्यंत खराब झाली. इशान किशन शून्य रनवर आऊट झाला, तर तिलक वर्मा 1 रनवर माघारी परतला. 51 रनवरच अर्धी भारतीय टीम पॅव्हेलियनमध्ये परतली.
advertisement
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 187 रनचा डोंगर उभा केला. 20 रनवरच दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या 3 विकेट पडल्या होत्या, पण त्यानंतर डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यात 50 बॉलमध्ये 97 रनची पार्टनरशीप झाली. मिलरने 35 बॉल 63 आणि ब्रेविसने 29 बॉल 45 रन केले, तर ट्रिस्टन स्टब्सने 24 बॉलमध्ये नाबाद 44 रनची खेळी केली. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर अर्शदीपला 2 विकेट मिळाल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबेला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : कॅचसाठी दोघं धावले, अंगावर पडले, तरी बॉल सोडला नाही... आफ्रिकेच्या थरारक फिल्डिंगचा Video
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement