advertisement

ZIM vs AUS : पराभव बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा, पण टीम इंडियासाठी गुडन्यूज, 'वर्ल्ड चॅम्पियन' बनण्याचा योग जुळणार!

Last Updated:

विशेष म्हणजे या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला असला तरी टीम इंडियासाठी गुडन्यूज आहे. कारण या विजयाने टीम इंडियाचा 'वर्ल्ड चॅम्पियन' बनण्याचा योग जूळुन येणार आहे.

ZIM vs AUS
ZIM vs AUS
Zimbabwe vs Australia : टी20 वर्ल्ड कपमध्ये गुरूवारी ईटालीने नेपालचा 10 विकेटने पराभव करून मोठा उलटफेर केला होता.त्यानंतर आज झिम्बाबेने ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव करून दुसरा मोठा उलटफेर केला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला असला तरी टीम इंडियासाठी गुडन्यूज आहे. कारण या विजयाने टीम इंडियाचा 'वर्ल्ड चॅम्पियन' बनण्याचा योग जूळुन येणार आहे.
झिम्बाबेने ऑस्ट्रेलियासमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 146 धावांवर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे झिम्बाबेने हा सामना 23 धावांनी जिंकला होता.या विजयासह झिम्बाबेने टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये मोठा उलटफेर केला आहे. या विजयाने टीम इंडियाने वर्ल्ड चॅम्पियन बनेल असा योग जुळून येतो आहे.
advertisement
विशेष म्हणजे 2007च्या टी20 वर्ल्डकपमध्ये झिम्बाबेने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचा हरवलं होतं.त्या वर्ल्डकपमध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. त्यामुळे झिम्बाबे भारतासाठी लकी ठरला होता. आता पुन्हा तब्बल 19 वर्षांनी झिम्बाबेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.त्यामुळे आता सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा योग पुन्हा जुळून आला आहे.
advertisement
झिम्बाबेने ऑस्ट्रेलियाला दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सूरूवात खराब झाली होती.ऑस्ट्रेलियाचा जोश इंग्लिश 8 तर कॅप्टन ट्रॅविस हेडने 17 धावांवर आऊट झाले होते.त्यानंतक कॅमरन ग्रीन आणि टीम डेविड दोघेही शुन्यावर आऊट झाले होते. ऑस्ट्रेलियाची पाचव्या ओव्हरमध्ये 29 वर 4 विकेट अशी बिकट अवस्था झाली होती.त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 31 आणि मॅट रेन्शॉने 65 धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर इतर खेळाडू एकेरी धाव काढून बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 146 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे झिम्बाबेने हा सामना 23 धावांनी जिंकला होता.
advertisement
झिम्बाबेकडून यावेळी ब्लेसिंग मुजरबानीने सर्वाधिक 4 विकेट तर ब्रॅड इ्वानने 3 विकेट, रायन बुरल आणि वेलिंग्टन मसाकडझाने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ZIM vs AUS : पराभव बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा, पण टीम इंडियासाठी गुडन्यूज, 'वर्ल्ड चॅम्पियन' बनण्याचा योग जुळणार!
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement