advertisement

Thane News: ठाण्याचा कोना-कोपरा सुरक्षित, जिल्ह्याला 'आपत्ती कवच'; २५ वरिष्ठ अधिकारी आणि २०० जवानांची फौज मैदानात!

Last Updated:

ठाणे जिल्ह्यात आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून स्थानिक यंत्रणांना अत्याधुनिक उपकरणांचा वापर आणि बचाव कार्याचे प्रत्यक्ष धडे दिले जाणार आहेत.

News18
News18
ठाणे: ठाणे शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना कशा पद्धतीने मदत करावी, याचं प्रशिक्षण एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमला देण्यात आले आहे. परिस्थिती हाताबाहेर न जाता पूर्वीच एनडीआरएफच्या टीमला आणि एसडीआरएफच्या टीमला प्रशिक्षण देण्यात आले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ठाणे शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही पुर परिस्थिती किंवा इतरत्र कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम सहज मदतकार्य करू शकणार आहे.
ठाणे जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एकूण २५ अनुभवी अधिकारी आणि0 कर्मचारी ठाणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने पंधरा दिवसांसाठी मदत कार्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ठाणे शहर आणि ग्रामीणमधील एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमला हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीजनक परिस्थितीच्या वेळी टीमला मदतकार्य करणं जमायला हवं. कोणत्याही प्रकारचे जिल्ह्यावर संकट आले तरी ते सर्वतोपरी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम तयार राहायला हवी.
advertisement
शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 25 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहे. या सरावाचा उद्देश स्थानिक प्रशासकीय कर्मचाऱ्यांना आणि आपत्कालीन पथकांना बचाव कार्य आणि विशेष आपत्कालीन प्रतिसाद उपकरणांचा वापर यांसारखे ज्ञान त्यांना मिळावे, यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी आणि तहसिलदार सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. केवळ शासकीय अधिकारीच नव्हे, तर स्थानिक स्वयंसेवक, नागरी संरक्षण दल, पोलीस पाटील आणि ‘आपदा मित्र-सखी’ यांनाही या सरावात निमंत्रित करण्यात आले आहे.
advertisement
या प्रशिक्षणासाठी नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ येथील नागरी संस्था आणि तहसील कार्यालयांसह अशा अनेक ठिकाणच्या 200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: ठाण्याचा कोना-कोपरा सुरक्षित, जिल्ह्याला 'आपत्ती कवच'; २५ वरिष्ठ अधिकारी आणि २०० जवानांची फौज मैदानात!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement