नागपूर : एका चुकीमुळे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. हे संजय कुमार गुप्ता यांनी स्वतः अनुभवलं आहे. आजपासून तब्बल 22 वर्षांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात संजय गुप्ता मृत्यूच्या दारात पोहोचले होते. डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अनेक दिवस कोमामध्ये राहिले, स्मृती हरवली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, हा मुलगा वाचणार नाही. वाचला तरी मनोरुग्ण असेल. मात्र जिद्द, उपचार आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी नव्याने आयुष्य सुरू केलं.



