Virat Kohli : 28 रन करूनही विराटने इतिहास घडवला, T20 मधला रोहितचा 'महारेकॉर्ड' उद्ध्वस्त!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये रविवारी आरसीबी आणि सीएसके यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला, या सामन्यात आरसीबीचा 43 रननी विजय झाला आहे.
बंगळुरू : आयपीएल 2026 मध्ये रविवारी आरसीबी आणि सीएसके यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला, या सामन्यात आरसीबीचा 43 रननी विजय झाला आहे. आरसीबीने दिलेल्या 250 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेचा 19.4 ओव्हरमध्ये 207 रनवर ऑलआऊट झाला. या सामन्यात आरसीबीने दणदणीत विजय मिळवला असला तरी टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली मात्र अपयशी ठरला. विराटने या सामन्यात 2 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 18 बॉलमध्ये 28 रनची खेळी केली. कोहलीची विकेट अंशुल कंबोजने घेतली.
विराट कोहलीने सीएसकेविरुद्धच्या सामन्यात 28 रन केल्या, पण याचसोबत विराटच्या नावावर खास विक्रम जाला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर महारेकॉर्ड झालं आहे. टी-20 क्रिकेटमध्ये एका टीमविरुद्ध सर्वाधिक रन करण्याचा विक्रम विराटने केला आहे.
विराट कोहलीने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आतापर्यंत 37 सामने खेळले, ज्यात त्याने 37.12 च्या सरासरीने 1188 रन केले, ज्यात 10 अर्धशतकांचा समावेश आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये एखाद्या टीमविरुद्ध सर्वाधिक रन करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता.
advertisement
रोहितचा रेकॉर्ड मोडला
रोहित शर्माने केकेआरविरुद्ध 36 सामन्यांमध्ये 40.03 च्या सरासरीने 1161 रन केले आहेत, ज्यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितचा हा रेकॉर्ड तोडण्यासाठी विराटला सीएसकेविरुद्धच्या सामन्यात फक्त 2 रनची गरज होती. या 2 रन विराटने पहिल्याच ओव्हरमध्ये केल्या. विराटचा हा विक्रम स्पेशल आहे कारण टी-20 फॉरमॅटमध्ये एखाद्या टीमविरुद्ध एवढ्या रन करणं सोपं नाही, यासाठी सातत्याने आणि बराच काळ चांगली कामगिरी करावी लागते.
advertisement
विराट कोहलीने सीएसकेविरुद्ध हा महाविक्रम फक्त एक मोसम नाही तर अनेक वर्ष सातत्याने चांगली कामगिरी करून बनवला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये फक्त स्ट्राईक रेटच नाही तर सातत्यही तितकंच महत्त्वाचं आहे हे विराटने या रेकॉर्डच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे.
Location :
Bangalore,Karnataka
First Published :
Apr 05, 2026 11:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : 28 रन करूनही विराटने इतिहास घडवला, T20 मधला रोहितचा 'महारेकॉर्ड' उद्ध्वस्त!









