advertisement

Pune : 'अपहरण करून अत्याचार, जीवे मारण्याची धमकी', भिगवण प्रकरणाला 47 दिवसांनंतर वेगळं वळण!

Last Updated:

पुण्याच्या भिगवणमध्ये घडलेल्या घटनेला 47 दिवसांनंतर धक्कादायक वळण लागले आहे. भिगवण येथील पीडित मुलीवर झहीर शेखने लैंगिक अत्याचार करून बळजबरीने लग्न करण्यासाठी अपहरण केल्याचा आरोप आता पीडित तरुणीने केला आहे.

News18
News18
सुमित सोनवणे, प्रतिनिधी
पुणे : पुण्याच्या भिगवणमध्ये घडलेल्या घटनेला 47 दिवसांनंतर धक्कादायक वळण लागले आहे. भिगवण येथील पीडित मुलीवर झहीर शेखने लैंगिक अत्याचार करून बळजबरीने लग्न करण्यासाठी अपहरण केल्याचा आरोप आता पीडित तरुणीने केला आहे. अपहरण करून माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत व्हिडिओ काढल्याचे आणि सह्या घेतल्याची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे. या फिर्यादीनुसार चार जणांविरूध्द पोक्सो आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता.इंदापूर) येथे 17 फेब्रुवारी 2026 रोजी एका तरुणीचे अपहरण झालं होतं. 22 फेब्रुवारीला या मुलीचं लग्न ठरलं होतं, त्यासाठी ती, तिची विधवा आई आणि भाऊ सोने खरेदीसाठी गेले होते. खरेदी झाल्यानंतर अझर शेख याच्या मदतीने झहीर हरुण शेख आणि त्याचा भाऊ आयान हरुण शेख यांनी तरुणीला ओढून टेम्पोमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. आईने विरोध केला असता त्यांच्या मांडीत दांडका मारून आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तरुणीचे अपहरण केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.
advertisement

पीडित तरुणीचे खळबळजनक आरोप

'झहीर शेखने बारामतीमधील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन असतानाही लैंगिक अत्याचार केला. या अत्याचाराचे फोटो त्याने नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली आणि त्यानंतरही वारंवार अत्याचार केला. तसंच लग्न न केल्यास आई-भावाला जीवे मारण्याची आणि स्वतःला इजा करण्याची धमकीही दिली. खंडाळा (जिल्हा सातारा) मार्गे बारामतीला नेऊन जबरदस्तीने आम्ही लग्न केले असून स्वेच्छेने आले असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास भाग पाडले आणि स्टॅम्प पेपरवर धाक दाखवून सह्या घेतल्या', अशी फिर्याद 4 एप्रिल 2026 रोजी पीडितेने दिली आहे.
advertisement
19 फेब्रुवारीला आई-भावाला मारण्याची धमकी देऊन बारामती पोलिसात अझर आणि झहीरच्या सांगण्यानुसार जबाब दिला, पण त्यानंतर सुधारगृहात गेल्यानंतर आणि नातेवाईकांच्या ताब्यात आल्यानंतर पीडितेने घरच्यांना घटनाक्रम सांगितला. त्यानंतर 4 एप्रिलला पीडितेने तिच्यावर लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, अपहरण, इच्छेविरुद्ध व्हिडिओ काढणे, जबरदस्तीने सह्या घेणे, याबाबत बारामती पोलिसांना जबाब दिला.
पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून भिगवण पोलीस ठाण्यात 4 एप्रिल रोजी झहीर हरुण शेख, आयान हरुण शेख, अझर शौकत शेख आणि सद्दाम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune : 'अपहरण करून अत्याचार, जीवे मारण्याची धमकी', भिगवण प्रकरणाला 47 दिवसांनंतर वेगळं वळण!
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement