मुंबईत मोठी कारवाई, दोन संशयित दहशतवादी अटकेत; खेळण्यातील कारने दिल्ली हादरवण्याचा 'जैश'चा भयानक कट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Mumbai Police: मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या संयुक्त कारवाईत मोठा दहशतवादी कट उधळण्यात यश आले आहे. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून दिल्लीत स्फोट घडवण्याची योजना हाणून पाडली आहे.
मुंबई: मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करत एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. या कारवाईत मोसाब अहमद उर्फ कलाम आणि मोहम्मद हमाद कलरा या दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे दिल्लीमध्ये खेळण्याच्या कारचा वापर करून स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. या कटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कुर्ला आणि खडवली परिसरात संयुक्त मोहीम राबवून दोघांना ताब्यात घेतले.
कलाम आणि कलरा हे दोघेही ऑनलाईन माध्यमातून कट्टरपंथी विचारांकडे वळले होते आणि त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते, असे तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे. त्यांच्या ताब्यातून काही संवेदनशील साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
सध्या दोन्ही आरोपींना दिल्लीत नेण्यात येत आहे. तेथे त्यांना न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी (रिमांड) मागितली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमार्फत केला जाणार आहे. या कारवाईमुळे राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला होण्यापासून टळल्याचे मानले जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 10:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत मोठी कारवाई, दोन संशयित दहशतवादी अटकेत; खेळण्यातील कारने दिल्ली हादरवण्याचा 'जैश'चा भयानक कट










