काल परभणी मध्ये झालेल्या घटनेनंतर आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, या बंदला बाजारपेठेमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज आंबेडकरी संघटना, नागरिक आणि परभणीकरांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला असून शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोठा मोर्चा काढत, काल झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. परभणी शहरात दगडफेक, रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
Last Updated: December 11, 2024, 15:16 IST