advertisement

Kalyan : बारावीच्या विद्यार्थिनीने घरात संपवलं आयुष्य, चिठ्ठीतील 'ते' भयानक सत्य वाचून सर्वजच हादरले

Last Updated:

Kalyan Shocking News : बारावीचे पेपर सुरु असताना कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे नेमकं काय घडलं आणि कोणासोबत घडलं ते जाणून घ्या.

Kalyan Class 12 Student Dies, Exam Pressure Suspected
Kalyan Class 12 Student Dies, Exam Pressure Suspected
कल्याण : गेल्या काही दिवसांपासून इयत्ता 12 ची परीक्षा सुरु आहे. राज्यातील लाखोंच्या संख्येने विद्यार्थी ही पेपर देत आहेत. त्यात एक अतिशय दु:खत घटना समोर आलेली आहे.
12 वीच्या मुलीचं टोकाचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शहरातील बारावीमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने नापास होण्याच्या भीतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात घडली.
संबंधित विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेत होती. परीक्षेचे पेपर अपेक्षेप्रमाणे झाले नसल्यामुळे ती तणावाखाली होती. आपण परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाही अशी भीती तिच्या मनात होती. याच नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
चिठ्ठीतून समोर आले धक्कादायक कारण
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत तिने,''माझे पेपर चांगले गेले नाहीत. मी आई-वडिलांना त्रास द्यायचा नाही,''असे लिहिले आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आई-वडील मोठ्या मानसिक धक्क्यात आहेत.या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला परीक्षा तणाव आणि मानसिक दबाव पुन्हा एकदा समोर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan : बारावीच्या विद्यार्थिनीने घरात संपवलं आयुष्य, चिठ्ठीतील 'ते' भयानक सत्य वाचून सर्वजच हादरले
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement