आई वडिलांच्या मोबाईलचा लॉक उघडला नाही, 7 वर्षांच्या मुलानं थेट पोलिसांनाच बोलावलं, मग काय घडलं?

Last Updated:

smartphone addiction in childrens - मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. जेवण कमी करणे, चिडचिडेपणा, वागण्यात बदल यासारखी लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत. मुलांना मोबाईलचे व्यसन जडल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
हरिकांत शर्मा, प्रतिनिधी
आग्रा : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. आजकाल मुलांमध्ये मोबाईलचे आकर्षण आणि वापर वाढत आहे. मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. जेवण कमी करणे, चिडचिडेपणा, वागण्यात बदल यासारखी लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत. मुलांना मोबाईलचे व्यसन जडल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली.
advertisement
एका सात वर्षांच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या मोबाईलचा लॉक न उघडल्याने एमरजन्सी नंबरवर कॉल करुन पोलिसांना घरी बोलावले. आग्राच्या दयालबाग येथील राम मोहन विहार क्षेत्रात ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास मुलगा आपल्या आई-वडिलांचा मोबाईल पाहत होता. मात्र, त्याचा लॉक न उघडल्याने चुकीने त्याने एमरजन्सी मोबाईलवर कॉल केला.
कॉल रीसिव्ह होताच पोलिसांनी सतर्कता दाखवत मुलाला प्रश्न विचारला. मात्र, मुलाने धक्कादायक जबाब दिला. आई-वडिलांनी मला मारहाण केली आहे, असा धक्कादायक जबाब देताच पोलिसांनी तत्काळ त्याच्या घरी धाव घेतली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता मुलाला कुणीच मारहाण केली नाही. तसेच लॉक न उघडल्याने त्याने रागाच्या भरात हा जबाब दिल्याची कबुली पोलिसांना दिली. तर भविष्यात अशी चूक करू नये, असे पोलिसांनी त्याला प्रेमाने समजावले. दरम्यान, या घटनेने पोलिसांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.
advertisement
पोलिसांचा आई वडिलांना सल्ला -
पोलिसांनी मुलाच्या आई वडिलांना हा सल्ला दिला की, त्यांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे आणि त्यांना त्याच्या नुकसानीबाबत सांगावे. लहान मुले मोबाईल जितका कमी वापरतील, तितके ते त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. यामुळे मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास सुधारेल. तसेच वास्तविक जीवनात अधिक सामाजिक आणि सक्रिय होतील.
advertisement
समाजासाठी मोठा संदेश -
मोबाईलचा अतिवापर मुलांमध्ये धोकादायक रूप धारण करू शकतो. पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवावे. त्यांना मोबाईल फोनऐवजी अभ्यास व इतर कार्यात व्यस्त ठेवावे, हा संदेश या घटनेने दिला आहे.
मराठी बातम्या/Viral/
आई वडिलांच्या मोबाईलचा लॉक उघडला नाही, 7 वर्षांच्या मुलानं थेट पोलिसांनाच बोलावलं, मग काय घडलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement