भारताच्या आकाशात दिसला रहस्यमयी प्रकाश, सगळे घाबरले; शास्त्रज्ञांनी सांगितला ते काय

Last Updated:

बंगळुरूच्या आकाशात एक दुर्मिळ दृश्य दिसलं.  शास्त्रज्ञाने सत्य सांगितलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

News18
News18
बंगळुरू : अंतराळ, आकाशात बरंच काही घडत असतं. जे आपल्या कल्पनेपलीकडचं असतं. आकाशातील अशीच एक घटना, ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. भारताच्या आकाशात एक रहस्यमयी प्रकाश दिसला. हा प्रकाश कसला असा प्रश्न अनेकांना पडला.
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये हे दृश्य दिसलं. खगोलशास्त्राची आवड असलेल्या दीपक चौधरी यांनी शनिवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान हे दृश्य टिपलं. चौधरी म्हणाले की, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 4.30 च्या सुमारास मी आकाश निरभ्र आहे की नाही हे पाहण्यासाठी उठलो आणि जेव्हा मला ते पूर्णपणे स्वच्छ दिसले तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. माझा DSLR कॅमेरा आणि 20 वर्ष जुनी लेन्स ट्रायपॉडवर बसवल्यानंतर मी आकाशाच्या प्रतिमा टिपण्यास सुरुवात केली.
advertisement
हा प्रकाश कसला?
हा प्रकाश म्हणजे धूमकेतू.  शहराच्या आकाशात दिसलेला धूमकेतू C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) आहे. 9 जानेवारी 2023 रोजी चीनच्या पर्पल माउंटन वेधशाळेने हा धुमकेतू शोधला होता. एका महिन्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील लघुग्रह टेरेस्ट्रियल-इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टम (ATLAS) द्वारे त्याचं निरीक्षण केलं गेलं. ज्यावरून हे नाव पडलं.
'हिंदू' मधील एका अहवालानुसार, धूमकेतू C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) हा नॉन-पीरियडिक धूमकेतू आहे.
advertisement
भारतातून धूमकेतू टिपण्याची पहिलीच वेळ
दीपक चौधरी म्हणाले की, त्यांचा पहिला प्रयत्न. धूमकेतू C/2023 A3 त्यांच्या स्क्रीनवर पाहून मला खूप आनंद झाला. ते म्हणाले की 'ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे, कारण उत्तर गोलार्धात इतक्या जवळून भारतातून धूमकेतू टिपण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.'
पुन्हा दिसणार धुमकेतू
बंगळुरूतील खगोलभौतिकशास्त्रज्ञ आर.सी. कपूर म्हणाले की, हा धूमकेतू 27/28 सप्टेंबरच्या मध्यरात्री सूर्यापासून 5.6 कोटी किमी अंतर पार करेल. ऑक्टोबरच्या पहिल्या काही दिवसांत ते पहाटे दिसेल.
advertisement
तेव्हा तो पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवरून जात असेल, तोे दुर्बिणीच्या मदतीने, उघड्या डोळ्यांनीदेखील पाहिलं जाऊ शकतो.
मराठी बातम्या/Viral/
भारताच्या आकाशात दिसला रहस्यमयी प्रकाश, सगळे घाबरले; शास्त्रज्ञांनी सांगितला ते काय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement