Manoj Jarange Patil : अंतरवली ते भांबेरी! ..अन् मनोज जरांगे नरमले; रात्री कुठे होते मुक्कामी?

Last Updated:

रात्री जरांगे पाटील यांनी भांबेरी या गावात मुक्काम केला होता. इथून ते मुंबईच्या दिशेने जाणार होते. मात्र, आता जरांगे पाटील यांनी लगेच मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील
जालना : मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र मराठा बांधवांनी त्यांना मुंबईला जाऊ नये अशी विनंती केली. रात्री जरांगे पाटील यांनी भांबेरी या गावात मुक्काम केला होता. अंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर जरांगे पाटील हे भांबेरी गावात मुक्कामी थांबले. एका कार्यकर्त्याच्या घरी जरांगे पाटील थांबलेले होते. इथून ते मुंबईच्या दिशेने जाणार होते. मात्र, आता जरांगे पाटील यांनी लगेच मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. तोपर्यंत मराठा बांधवांनी घरी जावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या भांबेरी या गावामध्ये जरांगे पाटील हे मुक्कामी होते. मात्र, याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसंच पहाटेच्या वेळी पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि बसही पेटवून देण्यात आली. याठिकाणी आता थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
advertisement
मनोज जरांगे सध्या भांबेरी गावात असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. या संचारबंदीनंतर जरांगे पाटील म्हणाले की,“मी संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मराठा बांधवांनी आपआपल्या घरी जावं. मी अंतरवाली सराटीत जाऊन उपचार घेईन. सगळ्यांनी शांततेत आपआपल्या गावी जावं.”
advertisement
अंतरवाली सराटीमध्ये पोलीस बंदोबस्त -
अंतरवाली सराटी आणि परिसरामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. अंतरवाली गावापासून आठ ते दहा किलोमीटर परिसरातच पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. आंदोलकांची गर्दी होणार नाही या दृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : अंतरवली ते भांबेरी! ..अन् मनोज जरांगे नरमले; रात्री कुठे होते मुक्कामी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement