Manoj Jarange Patil : एक पाऊल मागे का घेतलं? जरांगेंनी सांगितलं मुंबईऐवजी अंतरवालीला जाण्याचं कारण

Last Updated:

जरांगे पाटील म्हणाले की,“मी संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मराठा बांधवांनी आपआपल्या घरी जावं. मी अंतरवाली सराटीत जाऊन उपचार घेईन.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील
रवी जैस्वाल, जालना : सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर अजय बारस्कर या त्यांच्या जुन्या सहकाऱ्याने जरांगेंवर गंभीर आरोप केले. यामागे फडणवीस असल्याचा आरोप करत जरांगे रविवारी आक्रमक झाले. मराठा समाजासोबत सुरू असलेल्या बैठकीतून ते थेट मुंबईच्या दिशेने निघाले. रात्री ते भांबोरी गावात मुक्कामाला होते. दरम्यान, अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली.  या सर्व घडामोडीत जरांगे पाटील यांनी आज मुंबईला न जाता अंतरवाली सराटीला परत जाण्याचा निर्णय घेतला. अंतरवाली सराटीत ते दाखल झाले आहेत. आपण अंतरवालीला जाण्याचा निर्णय का घेतला? हेसुद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना आपआपल्या घरी जाण्याची विनंती केली आहे.  शांततेत आंदोलन करायचे आहे त्यामुळे सगळे घरी जा. देवेंद्र फडणवीस घाबरले आणि त्यांनी संचारबंदी लावल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे आपले धरणे आंदोलन सुरु आहेत ते सुरुच ठेवा. गावातीलपण पाच बांधव इथे थांबा बाकी सगळे घरी जा.
advertisement
जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले असून बसही पेटवून देण्यात आली आहे. अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी लगेच मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. तोपर्यंत मराठा बांधवांनी घरी जावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.
advertisement
जरांगे पाटील म्हणाले की,“मी संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मराठा बांधवांनी आपआपल्या घरी जावं. मी अंतरवाली सराटीत जाऊन उपचार घेईन. सगळ्यांनी शांततेत आपआपल्या गावी जावं.” मनोज जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईला जाणे टाळले. पुन्हा अंतरवाली सराटीकडे फिरले. कायद्याचा आणि पोलिसांचा सन्मान म्हणून एक पाऊल मागे घेत असल्याचं त्यांनी म्हटलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Manoj Jarange Patil : एक पाऊल मागे का घेतलं? जरांगेंनी सांगितलं मुंबईऐवजी अंतरवालीला जाण्याचं कारण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement